‘पीएफसीसी’च्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते व समाजशील वकिलांचा समन्वय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jan-2021
Total Views |

PFCC _1  H x W:


मुंबई : १६ जानेवारी रोजी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, चंचल स्मृती येथे ‘पीपल्स फोरम फॉर सिव्हिल कन्सर्न’ची (पीएफसीसी) बैठक पार पडली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते आणि समाजशील वकिलांचा समन्वय घडवण्यात आला. यावेळी प्रास्ताविक अ‍ॅड. सुमेध हिंगे यांनी केले, तर ‘फोरम’ची भूमिका दै. ‘मुंबई तरुण भारत’चे प्रबंध संपादक दिलीप करंबेळकर यांनी मांडली.
 
 
कायद्याच्या मदतीने समाजाच्या हिताच्या मागण्या तडीस नेण्यासाठी काय करता येईल, याविषयी बैठकीत ऊहापोह करण्यात आला. यावेळी मान्यवर उपस्थितांनी आपले अनुभव आणि सूचना दिल्या. या सर्व सूचनांचा आढावा घेताना दै. ‘मुंबई तरुण भारत’चे संपादक किरण शेलार यांनी ‘पीपल्स फोरम फॉर सिव्हिल कन्सर्न’ संघटनेच्या रचनात्मक स्वरूपाची माहिती दिली. यावेळी भूषण मर्दे यांची ‘फोरम’च्या अध्यक्षपदी, तर सोमेश कोलगे यांची सचिवपदी आणि अ‍ॅड. सुमेध हिंगे यांची कोषाध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात आली.
 
 
या बैठकीचा समारोप सोमेश कोलगे यांनी केला. यावेळी दै. ‘मुंबई तरुण भारत’चे बिझनेस हेड रविराज बावडेकर, अ‍ॅड. अनिरुद्ध गानू, सुप्रसिद्ध माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली, अ‍ॅड. दीपक गायकवाड, अ‍ॅड. गौरेश खांडाळेकर, धृतिमान जोशी, अ‍ॅड. पार्थ मयेकर, अ‍ॅड. राखी बारोट, वैदेही दीक्षित-सावंत, अ‍ॅड. मयुरेश जोशी, अ‍ॅड. हृषीकेश जोशी, अ‍ॅड. जयेश मिंडे, भटू सावंत, संकेत देशपांडे, सागर शिंदे, प्रदीप गावडे, सुदर्शन खाडे, रवी गोळे, उत्तम मल्ला, सुधीर हेगिष्टे, डॉ. कृष्णा नाईक, दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या उपसंपादिका योगिता साळवी आदी उपस्थित होते.



@@AUTHORINFO_V1@@