मुंबईतून राज्यव्यापी कोविड लसीकरण सुरु...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jan-2021
Total Views |

cmo_1  H x W: 0



मुंबई :
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत बीकेसीमधून राज्यातील कोरोना लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. राज्यभरात आजपासून लसीकरण मोहिमेस सुरुवात होत आहे. यासाठी राज्यभरात पूर्वतयारी करण्यात आली आहे. महाराष्ट्रात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील बीकेसी येथे आयोजित करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेला उपस्थिती लावत लसीकरणाचा शुभारंभ केला. बीकेसी लसीकरण केंद्रावर मुख्यमंत्र्यांसह पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, स्थानिक काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी उपस्थित होते. लस आली म्हणजे संकट टळलेलं नाही, मास्क आणि सोशल डिस्टन्स पाळणे गरजेचे आहे, याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केला.

आहारतज्ज्ञ डॉ. मधुरा पाटील यांना मुंबईत पहिली लस देण्यात आली. तर डॉ मनोज पासांगे यांना दुसरी लस मिळाली. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरही लस टोचली जात असताना कोरोना योद्ध्यांजवळ उभ्या होत्या. याआधी नायर रुग्णालयात नर्स म्हणून कार्यरत राहिलेल्या पेडणेकरांनी लस टोचण्याची तयारी दर्शवली होती.

मुंबईत एकूण ९ केंद्रांवर ४० बूथवर लसीकरण सुरू झाले आहे. सुरवातीला दररोज सरासरी ४ हजार जणांचे लसीकरण करण्यात येणार आहे.बृहन्मुंबई महानगरपालिकेला पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटकडून कोविड १९ आजारावरील 'कोविशील्ड' या लसीचे सुमारे १ लाख ३९ हजार ५०० डोस उपलब्ध झाले आहेत. महानगरपालिकेकडे १ लाख ३० हजार लसींची लसीकरणासाठी नोंदणी झाली आहे. या मोहिमेसाठी ७ हजार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार तीन टप्प्यात लसीकरण करण्यासाठी आज सुरुवात झाली आहे. पहिल्या
टप्प्यात म्हणजे आज आरोग्य कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात क्षेत्रीय आघाडीवर काम करणारे स्वच्छता कर्मचारी व कामगार, पोलीस आदी. त्यानंतर तिसऱया टप्प्यात ५० वर्षावरील सर्व नागरिक तसेच ५० वर्षाखालील सहव्याधी (मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी) असणारे नागरिक यांना लसीकरण करण्यात येणार आहे. तिसऱ्या टप्प्यात मुंबईत ६३ लसीकरण केंद्रे सुरु करण्यात येणार आहेत. त्यांद्वारे दररोज सुमारे ५० हजार नागरिकांचे लसीकरण करता येणार आहे अशी माहिती महाराष्ट्र आरोग्य विभागाने आज दिली आहे.
@@AUTHORINFO_V1@@