श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी प्रत्येक रामभक्ताने यथाशक्ती योगदान द्यावे!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jan-2021
Total Views |


ritambara didi_1 &nb



मुंबई :
अयोध्येत श्रीरामांच्या भव्य मंदिराच्या निर्मितीसाठी ‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’ने व्यापक धनसंग्रह संपर्क अभियान आयोजित केले आहे. शुक्रवार, दि. १५ जानेवारी ते २७ फेब्रुवारीपर्यंत चालणार्‍या या व्यापक धनसंग्रह संपर्क अभियानात ‘श्रीराम मंदिर निर्माणसे राष्ट्रनिर्माण’ या संकल्पनेतून साडेचार लाख गावांशी, ११ कोटी परिवार म्हणजे ५० ते ६० कोटी रामभक्तांशी, संपर्क साधण्याची योजना बनवली आहे. अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीवर बनत असलेले भव्य श्रीराम मंदिर हे कोणा एका परिवार, संघटनेचे, मालकीचे नसून ते अखंड हिंदुस्तानाचे श्रद्धा व शक्तिकेंद्र आहेत. त्यामुळे श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी प्रत्येक रामभक्ताने यथाशक्ती योगदान करावे,” असे आवाहन ‘श्रीरामजन्मभूमी मुक्तीसंग्राम’ आंदोलनाच्या प्रमुख साध्वी ऋतंभरा (दीदी माँ) यांनी केले.

अयोध्येमध्ये भव्य राम मंदिर उभारणीसाठी रामभक्त आणि सर्वांचा हातभार लागावा यासाठी, ‘विश्व हिंदू परिषदे’ने ’श्रीरामजन्मभूमी मंदिर व धनसंग्रह व संपर्क अभियान’ सुरू केले आहे. हे अभियान दि. २७ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. कशाप्रकारे हे अभियान राबवणार आहे, याविषयी साध्वी ऋतंभरासह ‘विश्व हिंदू परिषदे’च्या मुंबईतील पदाधिकार्‍यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली.साध्वी ऋतंभरा यावेळी म्हणाल्या की, “इतक्या वर्षांचा गौरवपूर्ण लढा आहे, तो राष्ट्र मंदिराच्या म्हणजेच राम मंदिराने पूर्ण होत आहे. प्रभू श्रीराम यांचे मंदिर बनवण्यासाठी आम्ही दारोदारी जाणार आहोत. लाखो लोकांच्या मनात राम आहे. त्यामुळे सर्वांचे योगदान असावे यासाठी आम्ही सर्व पक्ष आणि धर्माच्या पलीकडे जाऊन हे कार्य करणार आहोत. सर्वांचा हातभार याला लागावा म्हणून वर्गणी गोळा करणार आहोत. श्रीरामजन्मभूमीवर बनवत असलेले भव्य राम मंदिर हे कोणा एका परिवार, संघटनेचे मालकीचे नसून ते अखंड हिंदुस्तानाचे श्रद्धा व शक्तिकेंद्र आहे. त्यामुळे सर्वांनी यथाशक्ती योगदान द्यावे,” असे साध्वी ऋतंभरा यांनी सांगितले. अयोध्येत उभारल्या जात असलेल्या भव्य राम मंदिरासाठी देशातील प्रत्येक रामभक्ताचा सहभाग असावा, म्हणून साडेचार लाख गावांमध्ये ११ कोटी कुटुंबांची म्हणजेच पन्नास ५० ते ६० कोटी नागरिकांपर्यंत श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी प्रत्येक रामभक्ताने यथाशक्ती योगदान द्यावे!


गावोगावी-शहराशहरांत हे अभियान ‘विश्व हिंदू परिषदे’चे स्वयंसेवक जाऊन करणार आहेत. तसेच यात दहा रुपयांपासून ते लाखो रुपये देणगी नागरिक देतील. त्याच्या पावत्यादेखील दिल्या जाणार आहेत. या अभियानात राम मंदिराच्या लढ्यात पूर्वीपासून सहभागी असणारे मोठे मान्यवरदेखील या अभियानात सहभागी होणार आहेत. जसे की, ऋतंभराजी काही दिवस मुंबईत हे अभियानात सहभागी होतील. यानंतर त्या पुण्याला जातील,” अशी माहिती श्रीराज नायर (विश्व हिंदू परिषद, मुंबई प्रवक्ते) यांनी दिली. अयोध्येत श्रीरामाचे भव्य मंदिर हे एकूण २.७ एकरच्या जमिनीवर बांधण्यात येईल. या भव्य मंदिराचे एकूण क्षेत्रफळ हे ५७,४०० चौरस फूट इतके असेल, तर मंदिराची एकूण लांबी ३६० फूट, एकूण रुंदी २३५ फूट, एकूण उंची (कळसापर्यंत ) १६१ फूट असेल, तर या मंदिरात पाच घुमट असतील. नव्या संरचनेत हे मंदिर एकूण तीन मजली असेल तर प्रत्येक मजल्याची उंची ही २० फूट इतकी असेल. त्याचबरोबर मंदिर परिसरातील उर्वरित ६७ एकर जागेत पुस्तकालय, अभिलेखागार, संग्रहालय, अनुसंधान केंद्र, यज्ञशाळा, वेदपाठशाळा, सत्संग भवन, प्रसाद वितरण केंद्र, प्रशासनिक कार्यालय, सभा मंडप, धर्मशाळा, विशिष्ट अतिथी निवास, प्रदर्शनी, पार्किंग, प्रसाधन गृह इत्यादी वास्तूंची निर्मिती केली जाणार आहे. श्रीराम मंदिराचे संपूर्ण निर्माणकार्य ‘एल अ‍ॅण्ड टी’ कंपनी करेल तर ‘टाटा कन्सल्टन्सी’ कंपनी मंदिराच्या बांधकाम प्रक्रियेत सहयोग करेल. संघ परिवाराचे सर्व कार्यकर्ते दहा, १०० आणि एक हजार इत्यादी रकमेची कुपन्स पुस्तिका घेऊन लोकांशी संपर्क साधतील. दोन हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेची देणगी दिल्यास ‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’ची पावती देण्यात येईल. तसेच ऑनलाईन पैसे पाठविण्यासाठी ‘श्रीरामजन्मभूमी न्यासा’ने एसबीआय बँकेत न्यासाचे बचत व करंट खाते उघडले आहे. अधिक माहिती करिता https://srjbtkshetra.org/ हे संकेतस्थळ पाहावे.
@@AUTHORINFO_V1@@