पत्नीनं पैसे परत केले , म्हणजे चौकशी थांबणार नाही- किरीट सोमय्या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jan-2021
Total Views |

raut and kirit_1 &nb 
 

मुंबई:
पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी सक्तवसूली संचलनालयाने शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांच्या पत्नी यांना एका व्यवहाराप्रकरणी समन्स बजावले होते, त्यानंतर काही दिवसांनी त्या चौकशीसाठी हजर देखील झाल्या मात्र पुन्हा चौकशीसाठी ईडीकडून त्यांना बोलावण्यात येणार आहे.त्यातच आज संजय राऊत यांनी पत्नीसोबत झालेल्या व्यवहारातील पैसे केले आहेत. यावर भाजप नेत्यांनी पत्नीनं पैसे परत केले म्हणजे चौकशी थांबणार नाही, तुमचं आणि प्रवीण राऊतांच्या संबंधाचा तपास तर व्हायलाच हवा असं म्हणत निशाणा साधला.
 
 
राऊत यांनी पैसे परत केले असल्याचा दावा केल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या म्हटले की, "संजय राऊत म्हणाले त्यांच्या पत्नीनं पैसे परत केले आहेत. पैसे परत केले म्हणजे चौकशी थांबेल हा संजय राऊत यांचा गैरसमज आहे.त्यांना चौकशीला सामोरं जावंच लागणार आहे. कारण प्रवीण राऊत आणि संजय राऊत यांच्यात व्यवहार काय होते. तसेच झालेल्या पैशांच्या व्यवहाराची चौकशी झालीच पाहिजे", असे सोमय्या यांनी म्हटले आहे.
 
 
 
या अगोदरच राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना आलेल्या नोटिशीवर सोमय्या यांनी म्हटले होते की, ही एचडीआयएलनं पीएमसी बँकेचे ५४०० कोटी हडपले आहेत. एचडीआयएलचे प्रवीण राऊत यांच्या कुटुंबाशी कोट्यवधी रुपयांचे आर्थिक व्यवहार झाले आहेत. याच प्रवीण राऊत यांचे संजय राऊत यांच्या कुटुंबाशी खास संबंध आणि आर्थिक व्यवहार आहेत. संजय राऊत व प्रवीण राऊत यांच्या कुटुंबाकडे कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आहे. हा पैसा कुठून आला? एचडीआयएलच्या माध्यमातून पीएमसी बँकेचा पैसा कुठून कुठे गेला? एचडीआयएल आणि त्यांच्या समूहातील कंपन्यांकडून दोन्ही राऊत कुटुंबांना किती रक्कम मिळाली?, याची चौकशी व्हायलाच हवी,' अशी मागणी सोमय्या यांनी केली होती. त्यामुळे पुन्हा एकदा ईडीच्या संबंधित उत्तर देताना संजय राऊत यांनी पत्नीने पैसे परत केल्याचा दाव्यानंतर, तुमची चौकशी संपली नाही , पुढे देखील तुमच्या आणि घोटाळे करणाऱ्या प्रवीण राउतचे संबंधांची चौकशी व्हायला हवी म्हणत संजय राऊत यांच्यावर सोमय्या यांनी निशाणा साधलाय.
@@AUTHORINFO_V1@@