'मुंडेंना पवारांचे अभय ; हा बेशरमपणाचा सर्वोच्च बिंदू'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jan-2021
Total Views |
 

bhatkhalkar anad pawar_1& 
 

मुंबई
: राष्ट्रवादीचे नेते व कॅबिनेट मिनिस्टर धनंजय मुंडे यांच्यावर महिलेने गंभीर आरोप केल्यानंतर त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा विरोधक मागत आहेत. मात्र त्यातच काल राष्ट्रवादी पक्षाचे शरद पवार यांनी याबाबत चौकशी करू आणि निर्णय घेऊ असे म्हटले होते. मात्र आज शरद पवार यांनी राजीनामा घेणार नसल्याचे स्पष्ट संकेत देत त्यांचे समर्थन करणारी वक्तव्य केली यावर भाजप नेत्यांनी शरद पवारांचा चांगलाच समाचार घेतला आहे.


 
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांना अभय देणे हा महाराष्ट्रातील राजकारणातला बेशरमपणाचा सर्वोच्च बिंदू आहे. कॅबिनेट मिनिस्टरवर बलात्काराचे गंभीर आरोप झाल्यानंतर बहात्तर तासानंतर साधा ए फायर घेतला जात नाही ,किंबहुना एफ आय आर का घेतलं जाऊ नये याची समर्थन करणारे उदाहरणं त्यांच्याच पक्षातील त्यांच्या सर्वोच्च नेत्याकडून केली जातात या पेक्षा लाजीरवाणी परिस्थिती महाराष्ट्राने पाहिलेले नाही. महाराष्ट्रातील ही जनता अस पाहत राहील, असा कोणाचा गैरसमज असेल महाराष्ट्राची जनता रस्त्यावर उतरून त्यामध्ये आंदोलन उभं करेल आणि राष्ट्रवादीला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असे भाजप प्रवक्ते व नेते किरीट अतुल भातखलकर यांनी म्हटले आहे.
@@AUTHORINFO_V1@@