ईडीच्या समन्सनंतर वर्षा राऊतांकडून त्या कर्जाची परतफेड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jan-2021
Total Views |

 

varsha raut_1  

ईडीकडून राऊतांची चौकशी


मुंबई - शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनी पीएमसी बँक- बँक घोटाळ्यातील आरोपीच्या पत्नीकडून घेतलेले ५५ लाख रुपयांच्या कर्जाची परतफेड केली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) हा खुलासा केली असून संचालनालयाने स्षटीकरण मागितल्यावर राऊत यांनी हे पाऊल उचलले. ईडीने गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून त्यांना चार समन्स बजावले होते.


 

पीएमसी बँक-एचडीआयएल कर्ज घोटाळ्यातील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची ईडीकडून चौकशी सुरू आहे. शहर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने हाऊसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (एचडीआयएल) च्या सारंग वाधवन, पीएमसी बँकेचे अध्यक्ष वरम सिंग आणि त्याचे व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांच्याविरूद्ध दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे ईडी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची चौकशी करत आहे. पीएमसी बँकेचे 4,355 कोटी रुपयांचे नुकसान करुन स्वत: नफा कमावल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. एचडीआयएलने प्रवीण राऊत यांच्यामार्फत पीएमसी बँकेकडून 95 कोटी रुपयांचे कर्ज काढून घेतल्याचा आरोप आहे. राऊत हे एचडीआयएलची सहाय्यक कंपनी गुरूशिष कन्स्ट्रक्शन्सचे माजी संचालक आहेत.


ईडीनुसार प्रवीण राऊत यांनी आपल्या पत्नी माधुरी यांना मिळालेल्या रक्कमेमधून 1.6 कोटी रुपये दिले. या पैशांमधून माधुरी यांनी वर्षा राऊत यांना बीनव्याजी 55 लाख रुपयांचे कर्ज दिले. ही रक्कम वर्षा राऊत यांनी दादर (पूर्व) येथे फ्लॅट खरेदी करण्यासाठी वापरली. या देवाण-घेवाणीची चौकशी करण्यासाठी इडीने वर्षा राऊत यांना समन्स बजावला होता. वर्षा-माधुरी या अवनी कन्स्ट्रक्शन या दुसर्‍या कंपनीचे भागीदार असल्याचे तपासात पुढे आले आहे. वर्षा यांना या संस्थेकडून केवळ 5,625 रुपयांच्या योगदानावर 12 लाख रुपये कर्ज मिळाले होते. ईडीनुसार या 12 लाख रुपयांच्या कर्जाची थकबाकी अजूनही बाकी आहे.

@@AUTHORINFO_V1@@