असे दिसेल डोंबिवलीतील आगरी-कोळी व वारकरी भवन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jan-2021
Total Views |

aagri koli bhavan_1 



मनसे आमदार राजू पाटील यांनी शेअर केले फोटो

 
 
डोंबिवली: आगरी-कोळी बोलीला राजाश्रय मिळावा यासाठी तिचे जतन आणि संवर्धन होणे आवश्यक आहे. आणि त्यासाठी पुढाकार घेत असलेल्या ठाण्यातील साहित्यिकांनी मनसे आमदार राजू पाटील यांची भेट घेऊन काही मागण्या केल्या होत्या. महाराष्ट्रातील बोलीभाषा संवर्धनासाठी आगरी भवन व वारकरी संप्रदायाकडून वारकरी भवन उभाणार असल्याची घोषणा ही राजू पाटील यांनी केली होती.


ठाण्याची मूळ भाषा असलेली आगरी-कोळी भाषा इतर बोलींप्रमाणो लुप्त होऊ नये यासाठी साहित्यिक सर्वेश तरे, भूमीपुत्र संघटनेचे अध्यक्ष सुशांत पाटील, चित्रकार-साहित्यिक मोरेश्वर पाटील, गीतकार-गायक दया नाईक यांनी मनसे आमदार राजू पाटील यांची भेट घेतली होती. आगरी कोळी बोलीभाषा जगविण्यासाठी आगरी कोळी बोली, संस्कृती जतन संवर्धनार्थ आगरी-कोळी भवन व आगरी कोळी भाषा दालन व्हावे, अशी मागणी केली गेली होती. आणि आमदार राजू पाटील यांनी एकंदर बोलीभाषा संवर्धनासाठी आपण सोबत प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.


aagri koli bhavan _1 


त्यानुसार आता डोंबिवली मध्ये उभे राहणारे आगरी-कोळी व वारकरी भवन कसे दिसणार याचे फोटो आमदार राजू पाटील यांनी शेअर केले आहेत. या वारकरी भवनात किर्तनकार वारकऱ्यांसाठी रात्री राहण्यासाठी व्यवस्था असेल. भजन, प्रवचन, किर्तनकार व समाजातील कोणत्याही प्रकारच्या गायकांसाठी एक रेकॉर्डीग स्टुडिओ येथे असेल. आगरी व विविध बोली भाषेतील साहित्य व एक ग्रंथालयसुद्धा असेल.




@@AUTHORINFO_V1@@