राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भंडारा रुग्णालयाला भेट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jan-2021
Total Views |


राज भवन _1  H x



भंडारा :
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील शिशु केअर यूनिटला आग लागुन झालेल्या दुर्घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले होते. त्यानंतर आज राज्यपालांनी या रुग्णालयास भेट दिली. यावेळी त्यांनी रुग्णालयाला लागलेल्या आगीत मृत्यू झालेल्या बालकांच्या कुटुबीयांना २ लाखांची मदत देण्याची घोषणा केली आहे. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, खासदार सुनील मेंढे, लोकप्रतिनिधी तसेच अधिकारी उपस्थित होते.


राज भवन _1  H x


ही दुर्घटना घडली त्यादिवशी राज्यपालांनी शोक संदेशात म्हंटले होते की, भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आगीच्या दुर्दैवी घटनेचे वृत्त समजुन तीव्र दु:ख झाले. घटनेत प्राण गमावलेल्या निष्पाप बालकांच्या कुटुंबीयांना आपल्या शोकसंवेदना कळवतो. आजच्या भेटी दरम्यान त्यांनी बालकांच्या कुटुंबियांना २ लाखाची मदत जाहीर केली.तसेच भविष्यात अशा दुर्घटना घडू नये या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या सूचना राज्यपालांनी यावेळी दिल्या.





गेल्या शनिवारी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुणालयातील नवजात शिशू अतिदक्षता कक्षाला लागलेल्या आगीत दहा बालकांचा मृत्यू झाला होता. तसेच, सात बालकांना सुरक्षितपणे वाचविण्यात आले.वाचलेल्या बालकांच्या कक्षाला राज्यपाल कोश्यारी यांनी भेट देवून बाळांच्या मातांसोबत संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची आस्थेवाईकपणे चौकशी केली. बालक आणि मातांची योग्य काळजी घेण्याची सूचना यावेळी त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना केली. त्यानंतर दुर्घटनाग्रस्त आयसीयू कक्षाला भेट दिली.राज्यपाल कोश्यारी यांनी जिल्हाधिकारी संदीप कदम आणि जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांच्याकडून त्यांनी रुग्णालयातील आगीच्या घटनेसंदर्भात सविस्तर माहिती घेतली. विविध संस्था आणि संघटनांच्या प्रतिनिधींनी यावेळी राज्यपालांना भेटून या घटनेसंदर्भात निवेदन दिले.
@@AUTHORINFO_V1@@