लस आली रे... ; कोरोनावरील लस मुंबईत दाखल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jan-2021
Total Views |

covishield_1  H



मुंबई :
केंद्र सरकारने भारत बायोटेक आणि सीरम या दोन कोरोना लसींना परवानगी दिली आहे. येत्या १६ जानेवारीपासून देशभरात लसीकरण सुरु केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमधून देशभरात १३ ठिकाणी लस पाठवण्यात आल्या आहेत. कोविड लसीचा पहिला साठा मुंबईत दाखल झाला आहे.


महानगरपालिकेच्या विशेष वाहनाने ही लस पुण्याहून मुंबईत आणण्यात आली. मुंबईत कांजूर येथील कोल्ड स्टोरेजमध्ये लस साठवली जाणार होती, मात्र या स्टोरेजचे काम अपूर्ण असल्याने लसीचा साठा परेलमधील एफ साऊथच्या पालिका कार्यालयात ठेवला जाणार असल्याची माहितीही संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट कडून सुमारे १,३९,५०० डोस बृहन्मुंबई महानगरपालिकेला उपलब्ध झाले आहेत. एफ/ दक्षिण विभाग कार्यालयातून मुंबईत लसीकरण केंद्रांमध्ये ही लस पोहोचवण्यात येईल. त्यामुळे १६ जानेवारीला लसीकरणाच्या राष्ट्रीय शुभारंभावेळी मुंबईतही लसीकरण सुरू करणे शक्य होणार आहे. मुंबईत कोविशिल्ड लस दाखल झाल्यानंतर आता ९ रुग्णालयातील केंद्रांवर त्यांच वितरण होणार आहे. मुंबईतील केईएम, सायन, नायर, व्हीएन. देसाई, भावा, राजावाडी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, बीकेसी जम्बो सेंटर याठिकाणी लसीकरण होणार आहे.



मुंबईत मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. गेल्या दहा महिन्यात कोरोनाविरोधात मुंबईकर लढा देत आहेत. मुंबई महापालिका आणि राज्य सरकारने केलेल्या उपाययोजनांमुळे काही प्रमाणात कोरोना आटोक्यात आला आहे. याच दरम्यान केंद्र सरकारने कोरोनावरील भारत आणि सीरम या दोन कंपन्यांच्या लसीला मान्यता दिली आहे. लस लवकरच उपलब्ध होणार असल्याने देशात आणि महाराष्ट्रात कोल्ड स्टोरेज उभारण्यात आले आहेत. मास्टर ट्रेनरला ट्रेनिंग देऊन लसीकरणासाठी कर्मचारी प्रशिक्षित करण्यात आले आहेत. लसीकरण केंद्रांवर लसीकरणाचा ड्राय रन घेण्यात आला आहे. त्यानंतर लस कधी येणार याची प्रतीक्षा असताना आज देशभरातील दिल्ली, चेन्नई, कोलकाता, गुवाहाटी, शिलाँग, अहमदाबाद, हैदराबाद, विजयवाडा, भुवनेश्वर, पाटणा, बंगळुरु, लखनौ, चंदिगढ अशा १३ ठिकाणी लस पाठवण्यात आली आहे.
@@AUTHORINFO_V1@@