ड्रग्सप्रकरणी नवाब मालिकांचा जावई एनसीबीच्या रडारवर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jan-2021
Total Views |

nawab malik_1  



मुंबई :
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) समन्स बजावले आहे. मुच्छड पानवाला ड्रग्ज प्रकरणात हे समन्स बजावण्यात आले आहे.
नवाब मलिक यांची कन्या निलोफर यांचे समीर खान हे पती आहेत. ड्रग्जप्रकरणातील संशयित करण सजनानी यांच्यासोबत समीर खान यांचा गुगल पे द्वारे २० हजार रुपयांचा व्यवहार झाला होता. सजनानी याने ड्रग्ज पुरवल्यामुळे समीर यांनी त्यांना २०हजार रुपये गुगल पेने पाठवल्याचे सांगितले. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एनसीबीने समीर यांना बोलावले असल्याची माहिती उघड झाली आहे.




ड्रग प्रकरणावरून एनसीबीच्या रडावर अनेक लोक आहेत. एनसीबीने गेल्या आठवड्यात ब्रिटीश नागरिक करण सजनानी आणि राहिला फर्निचरवाला यांच्याकडून २०० किलोचे ड्रग्ज जप्त केले होते. याप्रकरणी केम्प कॉर्नर येथील प्रसिद्ध मुच्छड पानावाला यालाही अटक करण्यात आली असून त्याला न्यायदंडाधिकाऱ्यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्याशिवाय मुच्छड पानवाला दुकानाचे मालक रामकुमार तिवारी यालाही एनसीबीने ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी अटक केली आहे. हे दोघे भाऊ आहेत. तिवारी बंधू दक्षिण मुंबईतील पॉश भाग कँप कॉर्नरवर पानाची दुकान चालवितात. दोघेही सहा सहा महिने हे दुकान सांभाळतात. या पान शॉपवर मोठमोठ्या बॉलिवूड हस्ती पान खाण्यासाठी येतात. यामुळे आतापर्यंत बचावलेले बॉलिवूडकर ड्रग प्रकरणात समोर येण्याची शक्यता आहे.गांजा, ड्रग्ज विकताना तिवारी पकडला गेला होता. त्यामुळे त्यालाही तुरुंगात टाकण्यात आले आहे.


किरीट सोमय्या यांचं ट्वीट
तत्पूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज सकाळी ट्वीटकरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका मंत्र्याचा जावई ड्रग्ज प्रकरणात एनसीबी चौकशीच्या फेऱ्यात असल्याचं म्हटलं होतं. परंतु या ट्वीटमध्ये त्यांनी कोणाचाही उल्लेख केला नव्हता. परंतु, त्यानंतर काही वेळातच त्यांनी आणखी एक ट्वीट केलं, ज्यात त्यांनी थेट नवाब मलिक यांचे नाव घेत " नवाब मलिक जवाब दो", असे ट्विट केलंय.






@@AUTHORINFO_V1@@