कोरोनाची संक्रात टळली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jan-2021
Total Views |
कोरोनाची संक्रात टळली
कल्याण डोंबिवलीला कोविडशिल्ड लसीचे सहा हजार डोस प्राप्त
मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांची माहिती
 
 

covid 19_1  H x 
 
 
 
 
 
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रसाठी राज्य सरकारकडून कोविड शिल्डच्या सहा हजार लसीचे डोस प्राप्त झाले असल्याने कोविडची संक्रात टळली आहे. कोविडमुक्त होण्यासाठी लसीकरणाची सुरूवात 16 जानेवारीपासून करण्यात येणार आहे अशी माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी पानपाटील यांनी दिली आहे.
 
 
कल्याण डोंबिवलीसाठी कोरोनाची लस आज सायंकाळी दाखल झाली. आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टर यांनी टाळ्य़ाच्या गजरात लसीचे स्वागत केले. विशेष म्हणजे 13 मार्चला कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोनाचा पहिला रूग्ण आढळून आला होता. दहा महिन्यांनी आज 13 तारखेला कोरोनाची लस ही कल्याण डोंबिवलीत दाखल झाली आहे. पहिल्या टप्प्यात ही लस आरोग्य कर्मचा:यांना देण्यात येणार आहे. या लसीकरण मोहिमेसाठी महापालिका हद्दीत चार लस केंद्रे आहेत. कल्याणमधील रुक्मीणीबाई रुग्णालय, शक्तीधाम केंद्र, डोंबिवलीतील शास्त्रीनगर रूग्णालय, डीएनसी शाळा याठिकाणी प्रत्येक दिवशी शंभर जणांना लस दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील पहिला लस दिल्यानंतर दुसरा टप्प्यातील डोस 28 दिवसांनी उपलब्ध करून दिला जाणार आहे.
 
 

चौकट- कल्याण डोंबिवली ही कोरोनाची हॉटस्पॉट ठरली होती. कोरोनामुळे 1 हजार 118 जणांना आपला जीव गमवावा लागला. कोरोनाची लागण 58 हजारांहून अधिक नागरिकांना झाली आहे. कोरोना रुग्णांच ी संख्या कमी झाली असली तरी अनेक जण कोरोनामुळे धास्तावले आहेत. कोरोना लसीचे काही साईड इफेक्ट होऊ शकतात त्यामुळे प्रत्यक्षात किती लोक ही लस टोचून घेतील हे प्रत्यक्ष लसीकरणादरम्यानच समजू शकेल.
 
 
--------------------------------------------------------------
@@AUTHORINFO_V1@@