अंदमानच्या किनाऱ्यावर सापडली ५० मृत समुद्री कासवे; विषबाधेचा संशय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jan-2021
Total Views |
sea turtle_1  H


आॅलिव्ह रिडले प्रजातीची कासवे

मुंबई (प्रतिनिधी) - उत्तर अंदमानच्या दोन किनाऱ्यांवर सुमारे ५० हून अधिक समुद्री कासवे वाहून आली आहेत. रविवारी दुपारी अचानक ही घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. वन विभागाने या मृत कासवांना ताब्यात घेतले असून शव विच्छेदन अहवाल अजूनही प्राप्त झालेला नाही. मात्र, या कासवांची यकृते काळी पडलेली आहेत.
 
 

sea turtle_1  H 
 

महाराष्ट्रात सागरी कासवांमधील आॅलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांच्या विणीच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. असे असताना अंदमान मध्ये मात्र मोठ्य़ा संख्येने मृत समुद्री कासवे वाहून येत आहेत. ही सगळी कासवे आॅलिव्ह रिडले प्रजातीची आहेत. रविवारी दुपारच्या सुमारास उत्तर अंदमानमधील काळीपूर आणि लामिया खाडी किनाऱ्यावर कमीतकमी डझनभर मृत कासव सापडली. ही बाब तातडीने वनविभागाला कळविण्यात आली व त्यांनी पशुसंवर्धन व पशुविज्ञान विभागाची मदत घेतली. याशिवाय मायाबंदरमधील करमातांग बीचवरही अशी घटना लक्षात आल्याची माहिती मिळाली. पशुसंवर्धन विभागाने मृत कासवांचे शवविच्छेदन केले आहे. कासवांच्या यकृतांमध्ये गुठळ्या झाल्याने ते काळे पडल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र, शवविच्छेदन अहवालाची प्रतिक्षा केली जात असल्याची माहिती अंदमानमधील पत्रकार डेनिस जिल्स यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली. ही मृत कासवे आॅलिव्ह रिडले या एकाच प्रजातीची असल्याने त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

@@AUTHORINFO_V1@@