नव्या अटींवरून संताप! 'व्हॉट्सअप'ने केली 'ही' मोठी घोषणा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jan-2021
Total Views |

Whatsapp_1  H x
 
 
 
नवी दिल्ली : सध्या 'व्हॉट्सअप'च्या नव्या पॉलिसीबाबत मोठा वादंग निर्माण झाला होता. यावर आता अखेर अधिकृतरित्या व्हॉट्सअपने स्पष्टीकरण दिले आहे. पॉलिसीमध्ये बदल झाल्याने मित्र किंवा कुटुंबियांसोबत केलेल्या तुमच्या चॅटिंगच्या गोपनियतेवर कोणताही परिणाम होत नाही, असं स्पष्टीकरण त्यांच्याकडून देण्यात आले आहे. नवीन पॉलिसी केवळ बिजनेस युजर्ससाठी आहे असेदेखील त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
 
 
 
 
 
 
 
"तुमचे खासगी मेसेज आधीप्रमाणेच १०० टक्के एंड-टू-एंड एन्क्रिप्शनअंतर्गत सुरक्षित ठेवले जाणार आहेत. पॉलिसीमध्ये बदल झाल्याने मित्र किंवा कुटुंबियांसोबत केलेल्या तुमच्या चॅटिंगच्या गोपनियतेवर कोणताही परिणाम होणार नाही असे स्पष्टीकरण व्हॉट्सअॅपने ट्विटरद्वारे दिले आहे. कंपनीने याबाबत दुसऱ्यांदा स्पष्टीकरण दिले आहे. नवीन पॉलिसी केवळ बिजनेस युजर्ससाठी आहे." असे स्पष्टीकरण कंपनीनेदिले आहेत.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@