धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्काराचा आरोप !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jan-2021
Total Views |

Munde_1  H x W:
 
 
 

कायद्यानुसार न्याय द्यावा भाजप नेत्यांची प्रतिक्रिया 

 
 
 
मुंबई : महाविकास आघाडीतील नेते व राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी बलात्कार केल्याचा आरोप करत नातेवाईक असलेल्या तरुणीने पोलिसांत तक्रार केली आहे. मुंबईतील ओशिवरा पोलिसांनी हा तिच्या तक्रारीचा अर्ज स्वीकारला असल्याचे पत्रात नमूद आहे.
 
काय म्हटले आहे त्या महिलेने तक्रारीत
 
संबधित महिलेने आपण महाराष्ट्रातील मंत्री यांनी माझावर अत्याचार केल्याचे म्हणत. तक्रार केलेल्या पत्राचे छायाचित्र ट्विटरवर टाकत. पत्रात महिलेने म्हटले आहे की, संबधित तरुणी धनंजय मुंडे यांच्या परीचायत आहे. माझ्यावर त्यांनी अत्याचार केला आहे. त्यांच्याबरोबर कसे संबंध आहेत याबाबत त्यांनी सांगत. १० तारखेला याबाबतची तक्रार दिली. ११ तारखेला मुंबई पोलिसांकडून अर्ज स्विकारण्यात आला आहे. २००६ पासून अत्याचार सुरु होते. पुढे बॉलीवूडमध्ये चांगली संधी मिळवून देण्याच्या नावाखाली इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप तिने तक्रारीत केला आहे. तसेच याचे व्हिडीओ काढून धमकावल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे.
 
 
 
Image_1  H x W: 
 
 
मला मदत करा महिलेची साद ...
 
मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे पोलीस माझी तक्रार घेत नसल्याचे आज तिने म्हणत, या तक्रारीची प्रत या महिलेने आज ट्विट करत. मुंबई पोलीस आयुक्त, मुंबई पोलीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत मला मदत करा असे म्हटले आहे.
 
 
कायद्यानुसार चौकशी व्हायला हवी आणि न्याय द्यावा...

 
यासंदर्भात ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ अधिकारी दयानंद बांगर यांनी माहिती दिली की तक्रार अर्ज आलेला आहे.पुढे चौकशी व अधिक तपास सुरू आहे असे त्यांनी म्हटले आहे. यावर धनंजय मुंडे आणि सत्ताधारी पक्षातील नेत्यांची संपर्क साधला असता, कोणत्याही नेत्यांची यावर प्रतिक्रिया आलेली नाही. या प्रकरणासंदर्भात विरोधी पक्षातील भाजप नेते अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे की, पीडित महिला तक्रार करत असेल तर कायद्यानुसार चौकशी व्हायला हवी आणि न्याय मिळायला हवा.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@