मुंबई - बंगळुरू हायवेवर भीषण अपघात ; दोघांचा जागीच मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jan-2021
Total Views |

pune _1  H x W:



पुणे :
मुंबई - बंगळुरू महामार्गावर आज सकाळपासूनच अपघातांची मालिकाच सुरु झाली आहे. आतापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी ६ अपघात घडले आहेत. पहाटेच्या सुमारास नर्‍हे येथील सेल्फी पॉईंटजवळ एका ट्रकने मालवाहतूक करणार्‍या ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. दोन्हीही वाहने साताऱ्याकडून मुंबईच्या दिशेने जात होती. अपघातामुळे वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या रांगा दूरपर्यंत लागल्या होत्या. सिंहगड रस्ता पोलीस ,राष्ट्रीय महामार्ग पेट्रोलिंग कर्मचार्‍यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली.


सोमवारी पहाटे या महामार्गावर भरधाव आलेल्या ट्रकने पुढील ट्रकला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. त्यात ट्रकमधील दोघांचा जागीच मृत्यु झाला तर एक जण जखमी झाला होता. तर दोन ट्रक समोरासमोर एकमेकांना धडकून पलटले होते. या अपघातामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. असे असतानाच कात्रजवरुन आलेल्या एका ट्रकचे नियंत्रण सुटल्याने तो भूमकर पुलावरुन खाली सर्व्हिस रोडवर कोसळला. त्यापाठोपाठ दोन ट्रकच्या मधून एक रिक्षा जात होती. त्यात मागील ट्रकने रिक्षाला धडक दिल्याने रिक्षा पुढील ट्रकला धडकली. त्यात दोन्ही ट्रकमध्ये रिक्षा अडकून पडली. त्यात रिक्षाचालक व प्रवासी महिला जखमी झाले. सुदैवाने महिलेचे २ महिन्यांचे बाळ सुखरुप बचावले आहे.
@@AUTHORINFO_V1@@