'मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला सर्वाधिक विरोध शिवसेनेचाच'

    11-Jan-2021
Total Views | 139

devendra fadnavis_1 



मुंबई :
शिवसेनेच्या गुजराथी मेळाव्यावरून विधानसभा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या दुट्टपी भूमिकेवरून निशाणा साधला. यावेळी त्यांनी "मुंबई-गुजरात बुलेट ट्रेन प्रकल्पाला सर्वाधिक विरोध करणारी शिवसेनाच आहे.' असे म्हणत टीका केली. मुंबईत पत्रकार परिषदेदरम्यान ते बोलत होते.

यावेळी ते म्हणाले,"गुजराथी समाजाला निवडणुकांकरिता का होईना शिवसेनाजवळ करण्याचा प्रयत्न करतेय याचा आम्हाला आनंद आहे. पण निवडणुकांव्यतिरिक्त इतर वेळीही शिवसेनेने गुजराती समाजासाठो थोडं सौदार्ह ठेवला तर ते ही आपले नागरिक आहेत. अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनला शिवसेना विरोध करते मात्र निवडणुकांसाठी गुजराती समाजाला आम्ही जवळ घेऊ म्हणते. त्यामुळे अशा कार्यक्रमात कोणी जवळ येत नसता तर कृतीतून जवळ येतात. निवडणुकांसाठी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आता जनाब बाळासाहेब ठाकरे झाले आहेत.आणि उर्दू कॅलेंडरदेखील शिवसेनेचे निघत आहेत. त्यामुळे निवडणुकांसाठी शिवसेनेची ही नौटंकी सुरु आहे. त्या त्या लोकांना हे कळते."असे म्हणत त्यांनी शिवसेनेचा समाचार घेतला.


'केंद्र सरकार चर्चेने विषय सोडवण्याचा प्रयत्न करते आहे.'


शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व प्रामुख्याने डाव्या संघटनाच करताना दिसत आहे. यात मोठ्या संख्येने सुरुवातीला शेतकरीही होते मात्र ते देखील आता निघून गेले आहे. कारण त्यांना लक्षात आला कि केंद्र सरकार सर्व मागण्या मान्य करत असताना केवळ आंदोलन चाललंच पाहिजे याकरिता काही लोक चालवायचा प्रयत्न करत आहे. केंद्र सरकार चर्चेने विषय सोडवण्याचा प्रयत्न करते आहे, असे फडणवीस म्हणाले.


'आहे ती सुरक्षा आम्हाला पुरेशी'


"सुरक्षा ठेवली काय किंवा कढून घेतली काय आम्हाला काहीही फरक पडत नाही. आम्ही बिना संरक्षणाचे फिरणारे लोक आहोत. आता आहे ती सुरक्षा आम्हाला पुरेशी आहे आणि तीही दिली नाही तरी काही हरकत नाही. मी वर्षानुवर्षे अगदी प्रदेशाध्यक्ष असताना देखील एक सुरक्षारक्षक मला नव्हता. मी गडचिरोलीला जायचो, मला एकही गार्ड दिला नाही तरीही मी संपूर्ण महाराष्ट्रात फिरू शकतो. त्यामुळे यावर आम्हाला कोणताही आक्षेप नाही.चंद्रकांत दादा पाटील म्हणले त्यानुसार आमचे जे गार्ड तुम्ही काढले ते महिलांच्या सुरक्षिततेसाठी उपयोगात आणा," असेही फडणवीस म्हणाले.



भंडारा रुग्णालय दुर्घटना ; 'सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा'


भंडारा रुग्णालयातील घटनेवर बोलताना ते म्हणाले,"आजही आमची मागणी तीच आहे कि यातील आरोपींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा हीच मागणी जनतेतून आहे. काही लोकांनी आपलं कर्तव्य पार न पाडल्यामुळे जर एखादी घटना झाली असेल तर तो सदोष मनुष्य वधच आहे. म्हणून ही कारवाई लवकरात लवकर व्हावी अशी मागणी जनतेची आहे त्यामुळेच आज भंडारा बंद देखील ठेवण्यात आला आहे." असेही ते म्हणाले.


अस्लम शेख बोलल्यामुळे 'सामनात' दोन आयुक्तांच्या मागणीवरून  अग्रलेख  नाही
मुंबई महापालिकेच्या दोन आयुक्तांच्या मागणीवरूनही फडणवीस यांनी शिवसेना व सामानावर टीका केली. ते म्हणतात,"हीच मागणी जर इतर कोणी केली असती तर मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव, मुंबईचे तुकडे करण्याचा प्रयत्न असे अग्रलेख 'सामनात' छापून आले असते.पण अस्लम शेख बोलल्यामुळे ते येत नाहीयेत." असे म्हणत त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121