अहमदनगर; काळवीटाची शिकार करुन केले मटण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jan-2021
Total Views |

black buck_1  H


वन विभागाकडून आरोपीचा शोध सुरू 


मुंबई (प्रतिनिधी) - अहमदनगर जिल्ह्यात काळवीटाला मारून त्याचे तुकडे करुन मटण करणाऱ्या इसमाच्या शोधात वन विभाग आहे.  या इसमाने काळवीटाची शिकार केली. त्यानंतर मांस खाण्यासाठी त्याच्या अवयवांचे तुकडे करुन ते घरी घेऊन आला होता.

शेवगाव तालुक्यातील मौजे करे टाकळी येथील अंकुश पवार, वय 35 याने काळवीटाची शिकार केल्याची माहिती वन विभागाला समजली होती. त्यानुसार वनधिकाऱ्यांनी पवारच्या घरी छापा टाकला. त्यावेळी अधिकाऱ्यांना त्याच्या घरात काळवीटाचे मटण आढळून आले. पवार याने जाळीच्या आधारे काळवीटाला पकडले. त्यानंतर त्याला मारून त्याचे तुकडे करुन तो घरी घेऊन आला होता. वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत काळवीट या प्राण्याला प्रथम श्रेणीचे संरक्षण म्हणजेच वाघाच्या दर्जाचे संरक्षण लाभले आहे. त्यामुळे त्याची शिकार करणे वाघाची गुन्हा आहे. आरोपी पवार याच्याकडे वन विभागाला एक दुचाकी मोटरसायकल, काळवीटाला मारण्यासाठी आलेले कुऱ्हाड, सुरे, धरण्यासाठी वापरलेल्या जाळे मिळाले. आरोपीला वन विभागाची कारवाईची चाहूल लागताच तो फरार झालेला आहे. सदर कारवाई उपवनसंरक्षक ,अहमदनगर आदर्श रेड्डी, सहाय्यक वनसंरक्षक एस. आर. पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी पाथर्डी, शिरीष निरभवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल पांडुरंग वेताळ ,वनरक्षक आप्पा घनवट, स्वाती ढोले, नौशाद पठाण,वनसेवक विष्णु सोले यांनी केली.
 
@@AUTHORINFO_V1@@