जम्मूमध्ये २ दहशतवाद्यांना अटक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jan-2021
Total Views |

Jammu_1  H x W:
 
 
नवी दिल्ली : जम्मू - काश्मीरमधील अवंतीपोरा येथे झालेल्या सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांच्या चकमकीत २ जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. जम्मू पोलिसांसह ४२ आरआर आणि सीआरपीएफ- १३० बटालयिनच्या तुकडीने ही संयुक्त कारवाई केली होती. अवंतीपोरा व त्राल भागातील दहशतवाद्यांना आश्रय देणे, शस्त्रांस्त्रांचा पुरवठा करण्यामध्ये त्यांचा सहभाग होता.
 
 
 
 
तसेच, हे दहशतवादी जैश-ए-मोहम्मद संघटनेला संवेदनशील माहिती पुरवत असल्याची माहितीही देण्यात येत आहे. दरम्यान, या अगोदर दहशतवादाला अर्थपुरवठा केल्याच्या आरोपावरून मुंबई हल्ल्यातील सूत्रधार व लष्कर ए तोयबाचा कमांडर झाकी उर रहमान लख्वी याला पाकिस्तानात अटक करण्यात आली होती. लख्वी हा २०१५ मध्ये मुंबई हल्ला प्रकरणात जामिनावर सुटला होता. दहशतवादविरोधी विभागाने पंजाबमध्ये गुप्तचरांच्या मार्फत मोहीम राबवली होती. त्यात लख्वी हा दहशतवादाला अर्थपुरवठा करीत असल्याचे निष्पन्न झाले होते.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@