भंडाऱ्यातील मृत बालकांच्या नातेवाईकांना मोदींकडून मदत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jan-2021
Total Views |

narendra modi_1 &nbs


पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी जाहीर 

मुंबई - भंडारा येथे रुग्णालयात लागलेल्या आगीमध्ये जीव गमावलेल्या बालकांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून मदत देण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मदत निधीला मान्यता दिली आहे. आगीत करुण अंत झालेल्या बालकांच्या नातेवाईकांबरोबरच गंभीर जखमींना मदत करण्यात येणार आहे. 
 
भंडारा जिल्ह्यातील सर्व सामान्य रुग्णालय हे गरिब आणि दुर्गम भागातून येणाऱ्या रुग्णांसाठी मोठा आधार आहे. त्यामुळे या रुग्णालयात सर्व प्रकारच्या उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. येथील सामान्य रुग्णालयाच्या या युनिटमध्ये मध्ये एकूण १७ नवजात बालके दाखल करण्यात आली होती. शनिवारच्या मध्यरात्री जवळपास २ वाजेच्या सुमारास नवजात बालके ठेवलेल्या कक्षाला अचानक आग लागली. जिल्हा सामान्य रुग्णालयातील आऊट युनिटमधून धूर निघत असल्याचे समोर आले ड्युटीवर असलेल्या नर्सने दार उघडून पाहिले, तर त्या रूममध्ये मोठ्या प्रमाणात धूर होता. त्यामुळे त्यांनी लगेच दवाखान्यातील अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर तातडीने अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून दवाखान्यातील लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले. मॉनिटरमध्ये असलेली सात बालके वाचवण्यात आली आहेत तर आउट युनिटमधील १० मुलांचा दुदैवी मृत्यू झाला. 
 
या घटनेमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या बालकांच्या नातेवाईंकाना पंतप्रधान निधी योजनेअंतर्गत मदत देण्यात येणार आहे. यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या बालकांच्या नातेवाईकांना २ लाखांची मदत आणि गंभीर जखमींना ५० हजार रुपयांची मदत देण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मान्यता दिली आहे. या घटनेबद्दल मोदी यांनी अतिव दुख: व्यक्त केले होते. केंद्राबरोबरच राज्य सरकारकडूनही मृत बालकांच्या कुटुंबाना मदत करण्यात येणार आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@