महापालिकेच्या नियंत्रण कक्षात ‘डिजिटल मोबाईल रेडिओ प्रणाली’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jan-2021
Total Views |

bmc_1  H x W: 0



आपत्कालीन परिस्थितीत मदतकार्याला येणार वेग




मुंबईः मुंबई महापालिकेचा नियंत्रण कक्ष आता अधिक ‘हायटेक’ होणार असून आणीबाणीच्या वेळी संपर्कासाठी ‘डिजिटल मोबाईल रेडिओ प्रणाली’ (डीएमआर) चा वापर केला जाणार आहे. त्यामुळे विनाअडथळा संपर्क होणार्‍या मदत कार्याला वेग येणार आहे.



मुंबईत आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास ती यशस्वीपणे हाताळण्यासाठी पालिकेचा नियंत्रण कक्ष आहे. आणीबाणीच्या वेळी मदतकार्य आणि संपर्कासाठी आपत्कालीन नियंत्रण कक्षात फोन, ‘हॉटलाईन’ आणि ‘अ‍ॅनालॉग बिनतारी संदेशवहन प्रणाली’ (व्हीएचएफ) वापरली जाते. त्याचबरोबरीने आपत्कालीन व्यवस्थापन विभागातर्फे विभाग कार्यालये, रुग्णालये, पालिकेचे वरिष्ठ अधिकार्‍यांच्या वाहनांवरही बिनतारी संच बसवण्यात आले असून ‘वॉकीटॉकी’ संच देण्यात आले आहेत. आपत्ती व्यवस्थापन विभागात ‘अ‍ॅनालॉग’ बिनतारी प्रणाली २००९ पासून कार्यरत असून या प्रणालीचा १० वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. त्यामुळे ही प्रणाली बदलून आता अत्याधुनिक अशी डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित ‘डिजिटल मोबाईल रेडिओ’ उपकरणे खरेदी केली जाणार आहेत.



आपत्कालीन व्यवस्थापन विभागात ‘डीएमआर’ प्रणाली असलेले ६५ बिनतारी संच, वाहनांवर बसवण्यासाठी ६० संच, इतर महत्त्वाच्या विभागांना वापरण्यासाठी २०१ वॉकीटॉकी संच, टेलिस्कॉपिक अँटीना, पाच रिपिटर संच तसेच प्रोग्रॅमिंग आणि डीसपॅचर खरेदी करण्यात येणार आहेत.




@@AUTHORINFO_V1@@