भंडारा दुर्घटना : १० बालकांचा जीव गेल्यानंतर सरकारला जाग ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jan-2021
Total Views |
 Thackeray_1  H
 
 


माझ्याकडे शब्द नाहीत : कुटूंबींयांना भेट दिल्यानंतर प्रतिक्रीया



भंडारा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी भंडाऱ्यातील भोजापूर येथे जाऊन दुर्दैवी कुटुंबियांची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले. या घटनेत मृत पावलेल्या पालकांचे सांत्वन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत इतकं हे प्रचंड दुःख आहे, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दुर्घटनाग्रस्त भंडारा जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. या घटनेच्या चौकशीसाठी विभागीय आयुक्त यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली असून या पथकात मुंबई मनपातील अग्निशमन दल प्रमुख यांचा समावेश असेल. या घटनेतील दोषींवर त्वरित कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
 
 
 
भंडारा जिल्हा रुग्णालयातील आगीत निष्पाप १० बालकांचा मृत्यू होणं ही अतिशय दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी घटना आहे. यासंदर्भात सखोल चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले. सध्याच्या काळात राज्यभरातली आरोग्य यंत्रणा, सर्व रुग्णालये कोरोनाशी लढत आहेत मात्र रुग्णालयाच्या सुरक्षेशी तडजोड होत असल्याचा प्रकार उघडकीस आला. यामुळे १० निष्पाप बाळांना आपला जीव गमवावा लागला. अशा दुर्घटना भविष्यात होऊ नये म्हणून राज्यातील सर्वच रुग्णालयांचे फायर ऑडिट झाले आहे की नाही हे पाहण्याचे उशीराचे शहाणपण आता राज्य सरकारला सुचले आहे.
 
 
मदत कराल पण जीव पुन्हा येईल का ?
 
घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर तसेच जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली, घटनेची विस्तृत माहिती घेऊन वाचलेल्या बालकांच्या उपचारांत कोणतीही हयगय होणार नाही, हे पाहण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. मृत पावलेल्या १० बालकांच्या पालकांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदतीची घोषणादेखील त्यांनी केली तसेच या आगीत कुणी जखमी झाले असल्यास त्यावरदेखील उपचार करण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले.
 
 
अग्निशमन दलाच्या जवानांना सलाम
 
या आगीतून अग्निशमन विभागाचे अधिकारी व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी सात बालकांना वाचविले आणि आग पसरू नये म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा केली म्हणून संपूर्ण रुग्णालय वाचले आहेत. वाचलेल्या बालकांवर कोणतीही हयगय न होता व्यवस्थित उपचार सुरू ठेवण्याचे निर्देश मंत्रालयातून देण्यात आले आहेत.
 
 
मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रीया
 
मी मुख्यमंत्री म्हणून या अतिशय दुर्दैवी घटनेत मरण पावलेल्या बालकांच्या पालकांच्या भावना समजू शकतो, त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. राज्य शासन त्यांच्या या दु;खात सहभागी आहे. पण इतकेच करून चालणार नाही. या दुर्घटनेसाठी जे जबाबदार असतील त्यांची चौकशी करून तात्काळ कठोरात कठोर कारवाई करण्यास मी गृहमंत्री आणि आरोग्य मंत्री दोघांनाही सांगितले असल्याचे मुख्यमंत्री म्हणतात.
 
 
 
नागपूरच्या अग्निशमन अभियांत्रिकी महाविद्यालयाचे तज्ज्ञ आणि विद्युत विभागाचे अधिकारी भंडारा येथे उपस्थित असून आगीच्या नेमक्या कारणांचा शोध घेताहेत असे सांगून मुख्यमंत्री म्हणतात की. या इमारतीतील बालकांसाठीच्या या नव्या कक्षाचे लोकार्पण २०१५ मध्ये झाले होते. मात्र त्याचे ऑडिट पूर्ण झाले होते किंवा नाही आणि झाले नसेल तर का झाले नव्हते याविषयी संपूर्ण माहिती घेऊन पुढील कारवाई लगेच करण्यात येईल. या दुर्घटनेच्या तपासाची अद्ययावत माहिती दररोज कळवायचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
@@AUTHORINFO_V1@@