भंडारा दुर्घटना : जळीत रुग्णालयाचे फोटो पाहून थरकाप उडेल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jan-2021
Total Views |

Bhandara _3  H
 
 
 
 

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली घटनास्थळाची पाहणी


मुंबई : भंडारा जिल्हा रुग्णालयात १० निष्पाप बाळांना आपल्या प्राणांना मुकावे लागले. त्या घटनास्थळाचा दुसरा दिवस हा तणावाचा आहे. रुग्णालयात मंत्री, बडे नेते भेट देत आहेत. अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढत आहेत. अग्निरोधक यंत्रणा, अग्निसुरक्षा यांचा आढावा घेत आहेत. मात्र, ज्या कोवळ्या जीवांनी या अग्नितांडवात आपले प्राण गमावले, ते ठिकाण, तो वॉर्ड दुसऱ्या दिवशीही अत्यंत भयाण दिसत आहे.
 
 
 

Bhandara _4  H  
 
 
 
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आज घटनास्थळी भेट दिली. त्यांनी या ठिकाणचे फोटो ट्विट करत भावना व्यक्त केल्या आहेत. "हेचं ते भंडारा जिल्हा रूग्णालयाचे युनिट जिथे व्यवस्थेच्या हलगर्जीपणाने १० निष्पाप चिमुकल्यांचा जीव घेतला. काल TV वर पाहिलेल्या बातमीपेक्षा कित्येक पटीत भिषण व भयावह प्रत्यक्ष पाहिल्यावर घटनेची तिव्रता कळाली. राज्यातील रूग्णालयांच सेफ्टी ऑडीट होण्यासाठी...लेकरांना जळून मरावं लागलं", अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
 
 

Bhandara _1  H  
 
 
 
दरम्यान, रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या रुग्णालयाची पाहणी केली आहे. घटनेस जबाबदार अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, त्यांच्यावर योग्य ती कारवाई होईल, असा इशारा त्यांनी दिला. यापूर्वी त्यांनी मृत बालकांच्या कुटूंबियांचे सांत्वन केले. त्यावेळी माझ्याकडे बोलण्यासाठी शब्द नाहीत, अशा भावना व्यक्त केल्या आहेत.




Bhandara _2  H
@@AUTHORINFO_V1@@