सुडाचे राजकारण ! फडणवीस, चंद्रकांतदादा आणि राज ठाकरेंची सुरक्षा कपात

    10-Jan-2021
Total Views |
Raj _1  H x W:
 
 


वाचा संपूर्ण यादी - कुणाला मिळणार कुठली सुरक्षा !

 
 
मुंबई : राज्य सरकारने महायुती सरकारच्या काळातील बड्या नेत्यांच्या आणि मंत्र्यांच्या सुरक्षेत मोठी कपात केली आहे. सुडाचे राजकारण आणि कोत्या मनाच्या निर्बुद्ध सरकारकडून दुसरी अपेक्षा नाही, अशी टीका आता यावर विरोधी पक्षांकडून केली जात आहे. विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजप नेते चंद्रकांत पाटील, विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर, आमदार प्रसाद लाड यांच्यासह मोठ्या विरोधी पक्ष नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारतर्फे एका परिपत्रकाद्वारे सुरक्षा कपात झालेल्या नेत्यांच्या नावांची यादी नव्याने सुरक्षा देण्यात आलेल्या नेत्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
 
 
 
ज्येष्ठ वकील उज्वल निकम आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्या सुरक्षेत मात्र ,वाढ करण्यात आली आहे. मोठे बंधु उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या नेतृत्वात घेण्यात आलेल्या निर्णयानुसार आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याही सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. त्यांच्याकडील बुलेटप्रुफ गाडीही काढून घेतली जाणार आहे. एका सुरक्षा आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. नेत्यांच्या सुरक्षेतील कपात करण्यामागे पोलीसांवर येणाऱ्या ताणाचे कारण पुढे करण्यात आले आहे. मात्र, याच वेळी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या सुरक्षेत मात्र, वाढ करण्यात आल्याचे दिसून येत आहे.
 
 
माझी कुठलीही तक्रार नाही! मी जनतेतला माणूस : फडणवीस
 
आमच्या सरकारच्या काळातही आम्ही सुरक्षेबद्दल बैठका घेत होतो. आज कुठलीही गरज नसणाऱ्यांना ही सुरक्षा दिली जात आहे. या सुरक्षेचे राजकारण केले जात आहे. मला त्यांच्या निर्णयाबद्दल कुठलीही तक्रार नाही. मी जनतेतला माणूस आहे. तळागाळात काम करणारा माणूस आहे. त्यांच्या या निर्णयामुळे मी माझे कुठलेही दौरे कमी करणार नाही.
 
 
सरकारे येतात आणि जातात ! : मुनगंटीवार
 
भाजपचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही ठाकरे सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे. ते म्हणाले, "सरकारचे धन्यवाद ! आपण माझी सुरक्षा काढली, नक्षलग्रस्त जिल्हात असल्यामुळे ही सुरक्षा देण्यात आली होती. पण आता नक्षलवाद संपलेला दिसतोय. आमची सुरक्षा काढली. असली तरीही जनतेच्या हिताच्या सुरक्षेसाठी आमचा आवाज आणखी धारदार होईल."
 
 
केवळ सुडाची भावना ! : राम कदम
 
ठाकरे सरकारने घेतलेल्या या निर्णयातून केवळ सुडाची भावना दिसून येत आहे. विरोधकांचा आवाज दाबण्याचे हे काम आहे, असा आरोप भाजप आमदार राम कदम यांनी केला आहे. "वर्षभरात भाजप नेत्यांनी महाराष्ट्र सरकारच्या अपयशाचा पाढा वाचून दाखवला. कोरोना काळातील मृतांना मदत करता आली नाही. कोकणातील लोकांना मदत करताना आली नाही. आता असले निर्णय घेऊन सुडाचे राजकारण केले जात आहे.", असा आरोप राम कदम यांनी केला आहे.
 
 
चिंता नाही : प्रवीण दरेकर
 
विधान परिषद विरोधी पक्ष नेते यांनीही या प्रकरणी सरकारचा समाचार घेतला आहे. सुरक्षा काढल्याबद्दलचे वृत्त ट्विट करत त्यांनी "आम्हाला आमची चिंता नाही, तुम्ही राज्याच्या जनतेची काळजी घ्या!", असा टोला त्यांनी सरकारला लगावला आहे.




१_1  H x W: 0 x






२ _1  H x W: 0