सरकारच्या निष्क्रीय धोरणांमुळे बलात्काऱ्यांच्या मनोधैर्यात वाढ !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jan-2021
Total Views |
nashik _1  H x
 
 


नाशिकमध्ये १३ वर्षीय मुलीवर सामुहिक बलात्कार,
आरोपींमध्ये महिलेचा सामावेश

नाशिक : महिला अत्याचाराच्या घटना ह्या, विकृतांना अत्याचाऱ्यांना पाठीशी घालण्याच्या धोरणांमुळे वाढत आहे, अशी टीका भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे. 'शक्ती' कायदा लागू करण्याच्या घोषणा केल्या जात असल्या तरीही बलात्काराच्या घटना काही थांबलेल्या नाहीत. संपूर्ण राज्याला हादरवून सोडणारी सामुहिक बलात्काराची घटना नाशिकमध्ये उघडकीस आली आहे. नराधमांनी १३ वर्षीय मुलीला चाकूचा धाक दाखवून बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
 
 
 
पीडित मुलीच्या आईने तक्रार नोंदवल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. भाजप चित्रा वाघ यांनी या प्रकाराचा निषेध व्यक्त करत राज्य सरकारवर आसूड ओढले आहेत. ही घटना संतपाजनक आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून अशा घटना थांबताना दिसत नाहीत. औरंगाबादच्या घटनेविषयी म्हणायचं झालं तर सरकारच अशा विकृतांना पाठीशी घालत आहे. सरकारच्या धोरणांमुळेच विकृतांचे मनोबल वाढताना दिसत आहे. कुठल्याही पद्धतीचा धाक हा बलात्काऱ्यांमध्ये नाही. पोलीस आणि सरकारने अशी भूमिका बदलली नाही तर राज्यात कितीही कायदे लागू झाले तरीही महिलांची सुरक्षा वाऱ्यावरच असेल, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
 
 
 
आठवडाभरापूर्वी घडलेल्या या घटनेत एका अल्पवयीन आरोपीसह एका महिलेलाही अटक करण्यात आली आहे. पोलीसांनी रात्रभर शोध मोहीम राबवत ही कारवाई केली आहे. या प्रकरणात नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पीडितेचे आई-वडिल मजूरी करतात. ते कामानिमित्त बाहेर असताना हा प्रकार घडला. घरी परतल्यावर आपली मुलगी कुठे दिसेना म्हणून त्यांनी शोध सुरू केले. त्यावेळी भयभीत अवस्थेत ती आढळली होती.
 
 
 
आईने मुलीला विश्वासात घेऊन प्रकाराबद्दल माहिती विचारली असता हा सामुहिक बलात्काराचा प्रकार असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पोलीसांनी सुनील कोळे (वय २४, राहणार आम्रपाली झोपडपट्टी, कॅनॉलरोड), दीपक खरात (वय १९, राहणार, सिन्नर फाटा), रवी कुऱ्हाडे (वय १९, राहणार पांडवलेणी), आकाश गायकवाड (वय २४, राहणार रेल्वे ट्रॅक्शन, नाशिक रोड), सोमनाथ खरात (वय १९, राहणार गुलाबवाडी, मालधक्कारोड) आणि पूजा वाघ (वय २७) आदींना अटक केली आहे. रविवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना १६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.




@@AUTHORINFO_V1@@