२०२१ वर्षाची पहिली शुभवार्ता : भांडवली बाजारात टाटा समुहाचे वर्चस्व

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jan-2021
Total Views |
tata _1  H x W:



मुंबई : देशातील सर्वात मोठ्या उद्योग समुह मानल्या जाणाऱ्या टाटा सन्ससाठी २०२१ हे वर्ष गोड बातमी घेऊन आले आहे. भांडवली बाजारात नोंदणीकृत असणाऱ्या कंपन्यांपैकी टाटा समुहाचे भांडवल मुल्य हे सरकारी कंपन्यांच्या मुल्यांपेक्षाही अधिक झाले आहे. टाटाच्या समुहाच्या बाजार भांडवलाची एकूण किंमत हे ९.२८ लाख कोटी रुपये इतकी झाली आहे. ९.२४ लाख कोटी रुपये ही सरकारी कंपन्यांच्या भांडवलाची बाजार किंमत आहे.
 
 
 
टाटा सन्स सर्वात मोठा प्रमोटर
 
या शुभवार्तेमुळे टाटा सन्स देशातील भांडवली बाजारातील नोंदणीकृत कंपन्यांपैकी सर्वात मोठा प्रमोटर बनला आहे. गेल्या २० वर्षात ही घटना पहिल्यांदा घडली आहे की सरकारी कंपन्यांच्या शेअर मुल्याच्या घसरणीमुळे त्यांचे बाजार भांडवल कमी झाले आहे.
 
 
टाटाचे मुल्य ३४.४ टक्के वाढले
 
नोंदणीकृत कंपन्यांपैकी टाटा सन्सची भांडवली बाजारातील हिस्सेदारी एका वर्षात ३४.४ टक्क्यांनी वाढली आहे. याची एकूण किंमत ९.२८ लाख कोटी इतके झाले आहे. सरकारी कंपन्यांची भांडवली बाजारातील हिस्सेदारी ही १९.७ टक्क्यांनी घसरली आहे. डिसेंबर २०१९ मध्ये टाटा समुहाच्या तुलनेत सरकारी कंपन्यांची हिस्सेदारी ही ६७ टक्क्यांनी अधिक होती. मार्च २०१५ मध्ये नोंदणीकृत कंपन्यांचे मुल्य अडीच पटींने वाढले आहे.
 
 
२०१५ मध्येही मोडला होता असाच विक्रम
 
टाटा समुहाच्या सर्व कंपन्यांचे भांडवल ३१ डिसेंबर २०२० पर्यंत १५.६ लाख कोटी रुपये इतके होते. त्यावेळी सरकारी कंपन्यांचे भांडवल हे १५.३ लाख कोटी रुपये इतके होते. २०१९ मध्ये सरकारी कंपन्यांचे बाजारमुल्य १८.६ लाख कोटी रुपये इतके होते. २०१९ मध्ये सरकारी कंपन्यांचे भांडवली मुल्य हे १८.६ लाख कोटी रुपये होते तर टाटा समुहाचे मुल्य ११.६ लाख कोटी रुपये होते.
 
 
टाटा समुहाच्या २९ कंपन्या नोंदणीकृत
 
 
आत्ताच्या घडीला टाटा समुहाची भांडवलाच्या दृष्टीकोनातून सर्वात मोठी कंपनी ही टीसीएस मानली जाते. या कंपनीचे भांडवली बाजारमुल्य ११ लाख कोटी रुपये इतके आहे. समुहाच्या अन्य कंपन्यांमध्ये टाटा मोटार्स, टाटा स्टील, टायटन आदी कंपन्यांचा सामावेश होतो. टाटा समुह आणि भांडवली बाजाराच्या तुलनेत रिलायन्स समुह आणि एचडीएफसी समुह सर्वात मोठा समुह मानला जातो.
 
 
सरकारी कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी
 
सरकारी कंपन्यांच्या शेअर्समध्ये मार्चमध्ये सर्वात जास्त तेजी दिसून आली. त्यांना एका वर्षातच्या तुलनेत आता घसरण नोंदवण्यात आली आहे. एसबीआय सारख्या बड्या कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण नोंदवण्यात आली आहे. बाजारातील तज्ज्ञांच्या मतानुसार येणाऱ्या वर्षात सुधारणा नोंदवली जाऊ शकते.


@@AUTHORINFO_V1@@