'कंगनाला हात लावला तर शिवसेनेची गाठ आमच्याशी'

    08-Sep-2020
Total Views |

karni sena_1  H



जाहू :
'कंगना हिमालयाची शान असून जर हिमाचल प्रदेशच्या मुलीला हात लावला तर शिवसेनेने महाराष्ट्रात करणी सेनेशी मुकाबला करण्यासाठी तयार राहावं.' असं आव्हानच करनी सेनेनं शिवसेनेला दिले आहे.



हिमाचल प्रदेश करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष पीयूष चंदेल म्हणाले की, अभिनेत्री कंगना रनौत हिमाचल प्रदेशचा अभिमान आहे. एकट्या कंगना रनौतने बॉलिवूडमधील ड्रग माफियांचा पर्दाफाश केला आहे. सुशातसिंग राजपूतच्या बाबतीत ज्याप्रकारे ती एकटी अभिनेत्री इतक्या धैर्याने संघर्ष करत आहेत. याचा परिणाम म्हणून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला. त्याचप्रमाणे बॉलिवूडमधील ड्रग माफियांच्या विरोधात एक मोर्चा समोर आला आहे. ते म्हणाले की यावरून असे दिसून येते की, तपासानंतर मोठी नावे किंवा अभिनेतेही या कामांमध्ये सामील असल्याचे समोर येईल. पियुष चंदेल यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी हिमाचलची मुलगी कंगना रनौतला धमकावणे व शिवीगाळ केल्याबद्दल तीव्र निषेध केला.तसेच कंगना राणौत ९ सप्टेंबरला मुंबईत येणार आहे. त्यावेळी करणी सेनेचे कार्यकर्ते एअरपोर्टपासून तिच्या घरापर्यंत तिचं संरक्षण करतील असंही पीयूष चंदेल यांनी सांगितले आहे.



दरम्यान,कंगनानं मी ९ सप्टेंबरला मुंबईत येतेय, कोणाच्या बापात हिंमत असेल तर थांबवा असं थेट आव्हान दिले होते. संजय राऊत यांनी मला मुंबई-महाराष्ट्रात येऊ नये अशी धमकी दिल्याचा आरोप कंगनाने केला होता. त्यानंतर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी कंगनाचं थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाही अशी थेट धमकी दिली होती. तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कंगनाबद्दल अपशब्द वापरले.या संपूर्ण वादामुळे केंद्र सरकारने कंगना राणौतला वाय दर्जाची सुरक्षा प्रदान केली आहे. मात्र त्यावरुन राज्य सरकारने केंद्रावर आणि भाजपावर टीका केली आहे. आता यात हिमाचल प्रदेशातील करणी सेनेने शिवसेनेला इशारा दिला आहे.