विदेशी निधीद्वारे वनवासींचे धर्मांतरण करणाऱ्या मिशनरींना दणका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Sep-2020
Total Views |
Home Ministry Suspends FC
 
नवी दिल्ली : परदेशातून मिळणाऱ्या आर्थिक मदतीचा वापर गोरगरीब वनवासी बांधवांना लालूच दाखवून धर्मांतरणासाठी करणाऱ्या १३ मिशनरी संस्थांचे परकीय चलन विषयक परवाने रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने आदिवासीबहुल भागात धर्मांतरण मोहिमा राबवणाऱ्या १३ मिशनरी संस्था आणि संघटनांचे परकीय चलन विषयक परवाने केंद्रीय गृहमंत्रालयाने रद्द करत दणका दिला आहे.
 
 
 
या संस्थांना 'धार्मिक' अजेंड्यामागे धर्मांतरणाच्या उद्देशाने यापुढे कोणताही परकीय निधी मिळू शकणार नाही. तसेच केंद्रीय गृहमंत्रालयाने झारखंडसह इतर राज्यांतील काही वनवासी बहुल भागात ख्रिश्चन धर्मात धर्मांतरणाच्या मोहिमा राबल्याचा अहवाल गुप्तचर संस्थांनी दिला आहे. या स्वयंसेवी संस्थांची व मिशनऱ्यांची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. तसेच या मिशनऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून परकीय निधीबाबत उत्तर देण्यास सांगण्यात आले.
 
 
केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार स्वयंसेवी संस्थांनी विहित मुदतीत उत्तर दिले नाही. नोटीशीला उशिरा उत्तर देणार्‍या मिशनरी स्वयंसेवी संस्थेचे कामकाज असमाधानकारक असल्याचे आढळले आहे. निलंबनाच्या नोटीशीला उत्तर देण्यासाठी आता १३ स्वयंसेवी संस्थांना सहा महिन्यांची मुदत देण्यात आली असून त्यानंतरही समाधानकारक उत्तर न मिळाल्यास एफसीआरए परवाना रद्द करण्याबद्दल निर्णय घेण्यात येईल.
 
 
परदेशातून मिळणाऱ्या आर्थिक मदतीचा उपयोग गोरगरीब वनवासी बांधवांना लालूच दाखवून धर्मांतरासाठी करणाऱ्या १३ मिशनरी संस्थांचे परकीय चलन विषयक परवाने रद्द करण्याच्या ऐतिहासिक निर्णयाबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे मनःपूर्वक अभिनंदन - अतुल भातखळकर, आमदार, भाजप


@@AUTHORINFO_V1@@