‘कोरोना’चा कहर (भाग २४) : ‘कोरोना’ व्हायरस आणि मानसिकता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Sep-2020
Total Views |
Corona_1  H x W


काही वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांचा मुख्य हेतू हाच असतो की, लोकांमध्ये भयगंड तयार करणे. कोरोना व्हायरसच्या या साथीचा अशा संधीसाधू लोकांनी स्वतःसाठी भरपूर फायदा करून घेतलेला दिसतो. ज्यावेळेस शासकीय व महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये व कोविड सेंटरमध्ये रुग्णांना विनामूल्य उपचार मिळत आहेत, त्याच वेळेस काही खासगी रुग्णालयांमध्ये तर कोरोनाच्या उपचारांसाठी लाखो रुपये आकारले जात आहेत. हे सर्व गौडबंगाल का चालू आहे? तर लोकांच्या मनात असलेल्या भीती, भयगंड व असुरक्षिततेच्या भावनेमुळे. एकदा का एखाद्याला तुम्ही असुरक्षित व धोक्यात आहात, असे बिंबवून दिले की बाकी पुढे काही करावे लागत नाही. भीतीपोटी मग तो माणूस काहीही करायला तयार होतो. औषधांचा धंदा हा असाच चालतो.


जगभरातील शास्त्रज्ञ कोरोनाची लस निघू शकते की नाही, याच्या प्रयोगात व शोधात आहेत. पण, अजूनही ठोस अशी लस मिळालेली नाही. तसेच सध्या जी उपचारपद्धती कोरोनासाठी वापरली जाते, त्यात खास कोरोनासाठी असे कुठलेही औषध आलेले नाही. There is no confirm specific medicine for Covid-19. रुग्णांवर विविध औषधे देऊन प्रयोगाअंती मग उपचार सुरू आहेत. परंतु, हीच प्रयोगशीलता जर प्राचीन आयुर्वेद व होमियोपॅथीसारख्या शास्त्रांनी करायची म्हटली, तर मात्र सर्व औषध कंपन्या एकत्र येऊन त्याला जोरदार विरोध करतात. आयुर्वेद व होमियोपॅथीमध्येसुद्धा या कोरोनासारख्या आजारावर अतिशय उपयुक्त व गुणकारी इलाज आहेत. परंतु, हे इलाज जर लोकांनी घेतले व ते बरे झाले, तर औषध कंपन्यांची चिडचिड होते. आता ही चिडचिड का होते, हे सूज्ञास सांगणे न लगे.


होमियोपॅथी व आयुर्वेदाने जर काही औषधे यावर सांगितली, तर त्यांना अनेक जाब विचारले जातात व त्यांना ते सिद्ध करायला सांगण्यात येते. परंतु, सध्या चालू असलेले त्यांचे प्रयोग मात्र जे रुग्णांवर होत आहेत, ते सर्व ग्राह्य धरले जातात. आयुर्वेद व होमियोपॅथीसारख्या सिद्ध शास्त्रांवर मुद्दाम अविश्वास दाखवला जातो व स्वतःच्या उत्पादनांचा अनाठायी बाजार केला जातो. एक चीड आणणारे व लोकांना फसवणारे उदाहरण पाहा-


प्रत्येकाने गुगलवर ‘Immunity Boosting Hand Sanitizer' असे शोधावे आणि बघावे की, कशी उत्पादनांची विक्री होते. सॅनिटायझरने रोगप्रतिकारक शक्ती वाढते, हा जावईशोध लावून केलेली विक्री यांना चालते. परंतु, होमियोपॅथी व आयुर्वेदाने शेकडो वर्षे सिद्ध केलेली औषधे यांना चालत नाहीत. मित्रांनो, खरंच विचार करा की, या प्रकाराने असे किती वर्षे व काळ तुम्ही फसवले जाणार आहात? आतातरी जागे व्हा व काय खरे व काय खोटे, याचा सारासार विचार करा. कुठल्याही चुकीच्या गोष्टीला व भूलथापांना बळी पडू नका. हे सर्व राजरोस चालते. कारण, माणसाच्या मनात भयगंड असतो व या भयापोटी माणूस हे चालवून घेतो. पुढील भागात या भयगंडापोटी अजून मनावर जे खोलवर परिणाम होतात, त्यावर आपण नजर टाकूया.
(क्रमशः)


- डॉ. मंदार पाटकर
(लेखक एम.डी. होमियोपॅथी आहेत.)



@@AUTHORINFO_V1@@