रियाची अटक अटळ ! दिपेशने दिली विरोधात साक्ष

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Sep-2020
Total Views |

Dipesh Sawant_1 &nbs
 
 

सुशांत सिंह प्रकरण : ड्रग्जच्या पुरवठ्यात दिपेश सावंतही सहभागी

 
 
मुंबई : सुशांत सिंह राजपूत प्रकरणात नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) यांच्यातर्फे मोठी कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. एनसीबीने रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक आणि सुशांतचा घर व्यवस्थापक सॅम्युअल मिरांडा यांना न्यायालयात हजर केले होते. त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शनिवारी सायंकाळी एनसीबीने सुशांतचा कर्मचारी दिपेश सावंतलाही अटक केली. त्याने सुशांतला ड्रग्ज घेताना पाहिले, असा दावाही केला आहे.
 
दरम्यान, रात्रभर दिपेशची चौकशी करण्यात आली. दिपेशने रिया चक्रवर्तीविरोधात साक्ष दिली आहे. चौकशी दरम्यान रियाच्या सांगण्यावरूनच घरात ड्रग्जचा वापर होत असल्याचं दिपेश म्हणाला, असे म्हटले जात आहे. रियाच्या अटकेसाठी दिपेशची साक्षच महत्वाची मानली जाणार आहे. एनसीबीने रियाला पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावले आहे. सकाळपासून रियाची चौकशी सुरू आहे. रात्री उशीरापर्यंत याबद्दल महत्वाची घडामोड घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 
 एनसीबीचे अधिकारी मुथा अशोक जैन यांच्या म्हणण्यानुसार, "रिया आणि शौविकला दिपेशच्या समोर बसवण्यात येईल. यानंतर तिघांनाही प्रश्न- उत्तरे विचारली जाणार आहेत. रियाचे ड्रग्ज चॅट समोर आल्याने नार्कोटीकची टीम मुंबईत दाखल झाली होती. शौविकच्या अटकेनंतर आता एनसीबी रिया चक्रवर्तीलाही अटक करू शकते अशी अटकळ वर्तवली जात आहे. अटकेनंतर तिला न्यायालयात हजर केले असता रिमांडवर घेता येईल.
 
दिपेशला न्यायालयात हजर करण्यात आलं होते. यानंतर त्याना ९ सप्टेंबरपर्यंत रिमांडवर घेण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. शनिवारी एनसीबीच्या दक्षिण-पश्चिम विभागाचे डेप्युटी डीजी मुथा अशोक जैन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की आधीपेक्षा यावेळी त्यांच्याकडे बरीच माहिती आहे. या प्रकरणात मीडियाने जो पाठिंबा दिला, यामुळे अधिक माहिती मिळाली. आता दोन आरोपींची रिमांड मिळाली आहे.

@@AUTHORINFO_V1@@