बस झाली नाटकं

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Sep-2020   
Total Views |

shivsena_1  H x


मराठी अस्मिता जागवण्यासाठी तुम्ही राज्यसभेत धुत, केनिया, नंदी निरूपम, प्रियांका चतुर्वेदी यांनाही पाठवले. (हे सगळे भारतीय असल्याने ते राज्यसभेत गेले यात काही गैर नाही) पण, या सगळ्या गोष्टी मराठी अस्मितेच्या बाहेरच्या आहेत का? मराठी माणूस भावनिक आहे, संवेदनशील आहे, पण मूर्ख आहे असे समजता का? बस झाली नाटकं.


‘अस्मिता’ म्हणजे काय? ऐनकेन प्रकारे सत्ता मिळवणार्‍यांची सत्ता टिकावी म्हणून जनतेला मूर्ख बनवणे म्हणजे अस्मिता असते का? छे, तर महाराष्ट्राची अस्मिता आहे छत्रपती शिवाजी महाराज. सगळा महाराष्ट्र त्यांचा वारसदार आहे. महात्मा फुले, टिळक, आगरकर आणि छत्रपती शाहू महाराजांची समरसता, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची रक्तविहीन ऐतिहासिक समाजक्रांती, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे अतुलनीय देशप्रेमी साहस ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. या सगळ्यांच्या अस्मितेला नाकारून आज महाराष्ट्राची अस्मिता केवळ एका राजकीय पक्षाच्या दावणीची, असे म्हणणे म्हणजे महाराष्ट्राचा आणि या थोर महात्म्यांचा अपमानच आहे. असो. कोरोना काळात मराठी माणूस जगला का मेला याचे सोयरसुतक नसलेले मराठी माणसाला साद घालत आहेत. पण मराठी माणसाने तुमच्या वैयक्तिक संशयकल्लोळामध्ये का पडावे? तुम्ही कुणाला हरामखोर म्हणाल, कुणाचे बाप काढाल. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युनंतर तमाम महाराष्ट्र तुमची अशी वैयक्तिक भांडणं, वाद पाहत आहे. या वादात कोरोनामुळे जेरीस आलेल्या मुंबईकराने का सामील व्हायचे? बरं, तुम्ही कंगना राणावतचे चपलेने तोंड फोडण्याच्या गप्पा कराल, त्यात मराठी माणसाला खेचाल तर मराठी माणसाने का चपलेने तोंड फोडायचे? त्याला काय मिळणार आहे? पोलीस केस? कोर्ट-कचेर्‍या? तुरूंग, अपमान, अवहेलना, देशोधडीला लागलेला संसार. काय मिळणार? ते तरी सांगा. स्वर्गीय बाळासाहेबांविषयी अद्वातद्वा बोलणारे छगन भुजबळ आज कुठे आहेत? देशद्रोही याकुब मेमनबद्दल पुळका असणारे असलम शेख आज कुठे आहेत? हुतात्मा स्मारकाला लाथा मारणार्‍या ओवेसीचा पक्ष, अबू आझमी आज कुठे आहे? कोरोना काळात महाराष्ट्रातून पळून गेलेले ते तबलिगी कुठे आहेत? गेला बाजार वाधवान कुटुंबाची सहल झाली का? मराठी अस्मिता जागवण्यासाठी तुम्ही राज्यसभेत धुत, केनिया, नंदी निरूपम, प्रियांका चतुर्वेदी यांनाही पाठवले. (हे सगळे भारतीय असल्याने ते राज्यसभेत गेले यात काही गैर नाही) पण, या सगळ्या गोष्टी मराठी अस्मितेच्या बाहेरच्या आहेत का? मराठी माणूस भावनिक आहे, संवेदनशील आहे, पण मूर्ख आहे असे समजता का? बस झाली नाटकं.



रणरागिण्यांना हक्क द्या!


मराठी अस्मिता, मराठी बाणा म्हणत कष्टकरी मराठी मुंबईकरांना उल्लू बनवायला सुरुवात झाली की समजायचे मुंबई महानगरपालिका निवडणुका जवळ आल्या.मुंबई कुणाची? मुंबईचा प्राण असलेल्या वस्त्यांमध्ये जा. तिथे कळेल की मुंबई कुणाची? आता सुशांत सिंह राजपूत प्रकरणामुळे ड्रग्ज वगैरेचे जाळे उलगडणार आहे म्हणे. पण अर्धी मुंबई या ना त्या कारणाने नशेच्या विळख्यात आहे. आता ‘लॉकडाऊन’ असतानाही गल्लीबोळात हे धंदे सुरू होते. ‘मै मुुंबई पे राज करता हूं मुंबई पे’ म्हणणारे दादा, भाई, अण्णा, भाऊ आणि साहेब यांच्या गुंडागर्दीत सामान्य मुंबईकर जीव मुठीत घेऊन आजही जगतात. रस्ते, पाणी, शौचालय या मूलभूत सुविधांचे काय झाले? कायदा सुव्यवस्थेमुळे मुंबईच्या जीवात थोडा तरी जीव आहे. पण कोरोना काळात कायदा सुव्यवस्थेचे रक्षण करणार्‍या पोलीस दादांचे काय झाले? मुख्य म्हणजे, ज्या मराठी माणसाच्या नावाने राजकारणाचा भंडारा करता त्या मराठी माणसांचे काय झालं? मुंबई महानगरपालिकेची कंत्राट, म्हाडाचे परवाने, नवीन बिल्डिंग प्रोजेक्ट, उद्योगधंद्याचे परवाने कुणाला मिळाले, याचा नुसता मागोवा घेतला तरी समजेल की, ‘मुंबई आमची’ म्हणणार्‍यांनी मुंबई कुणाची केली आहे ते. तेही जाऊ द्या.


राजकारण उत्तम शिजावे म्हणून रणरागिण्यांना आंदोलनात नेहमीच उभे केले गेले. रणरागिण्यांचे शौर्य आणि नि:स्वार्थी वृत्ती आजही अभिमानास्पद आहे. पण दैनंदिन जगण्यात या मातामाऊलींना काय संघर्ष करावा लागतो याचे गणित कोण मांडणार? महाराष्ट्रभरातून मुंबईत केवळ पोराबाळांना जगवण्यासाठी आलेल्या आमच्या रणरागिणीला हक्काचं घर मिळालं का? दिवा, कल्याण, अंबरनाथ, पनवलेच्या पुढे नाही हं, मुंबईत. तिच्या मुलांना मुंबईतल्या नामांकित शाळा-कॉलेजात शिक्षण मिळाले? तिची मुलं उद्योगपती, नेते किंवा तत्सम मोठ्या प्रशासकीय पदावर आहेत? मराठी अस्मिता ज्यांच्या जीवावर तगली, ते सामान्य मरमरून जगत आहेत. मात्र, या मरमरून जगणार्‍यांना बळीचा बकरा बनवून स्वत:च्या सत्तेची पोळी भाजणारे मात्र चाणक्य, किंग मेकर (जोकर नव्हे, काहीही वाचू नका), सत्ताधीश बनले. त्यांची पोरंबाळं, भाऊ-बहिणी राज्यकर्त्यांच्या भूमिकेत विनासायस बसले. या सगळ्यांमध्ये आमच्या रणरागिण्या कुठे आहेत? त्यांना त्यांचे हक्क द्या.

@@AUTHORINFO_V1@@