कोरोना रिपोर्टचा घोळ, महिलेची रस्त्यातच प्रसुती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Sep-2020
Total Views |

Kolhapur Hospital_1 

 

आरोग्य व्यवस्थेचे धिंदवडे! मुल जन्माला येण्यापूर्वीच यातना

कोल्हापूर : कोरोना पॉझिटिव्ह की निगेटिव्ह या गोंधळामुळे आजरा तालुक्यातील एका माहेरवाशीण महिलेचे बाळंतपण चक्क रस्त्याशेजारी करण्याची वेळ आली आहे. यामुळे राज्याच्या आरोग्य प्रशासनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. भर वस्तीत घडलेल्या या प्रकाराने कोरोनाच्या दहशतीचा अनुभव शहरवासीयांना आला.
  
चिंचेवाडी (ता. गडहिंग्लज) येथील सासर व आजरा तालुक्यातील साळगाव येथील माहेरी आलेली एक महिला बाळंतपणासाठी सकाळी गडहिंग्लज येथे नेण्यात आले. मात्र, तेथील एकाही दवाखान्याने कोरोनाचे कारण पुढे करत त्यांना दाखल करून घेतले नाही. गर्भवतीला कुटुंबाने नेसरी येथे नेले, तिथेही हाच अनुभव कुटूंबाला आला.
  
शोध घेत घेत महिलेला आजरा शहरातील एका रुग्णालायत दाखल केले. आणले. येथे कोरोनासंदर्भात तिची चौकशी करण्यात आली. कुटुंबाने गडहिंग्लज येथे दिलेल्या रिपोर्टमध्ये ही महिला निगेटिव्ह होती. मात्र, गडबडीत रिपोर्टचा कागद फाटला होता. त्यानंतर आजरा रुग्णालयाने गडहिंग्लज येथे चौकशी केली त्यावेळी रुग्णालयाने ती महिला पॉझिटीव्ह असल्याचे सांगितले.परिणामी आजरा रुग्णालयानेही त्यांना दाखल करून घेतले नाही.
  
महिलेला प्रचंड वेदना होत असताना तिला त्याच अवस्थेत विव्हळत ठेवण्यात आले होते. रुग्णालयात डॉ. बी. एफ. गॉडद व डॉ. बी. बी. गॉडद शस्त्रक्रिया करत होते. महिलेचे हाल बघून मनसेचे माजी तालुकाध्यक्ष प्रभाकर कोरवी यांनी डॉक्टरांना फोनद्वारे परिस्थिती सांगितली.
 
डॉ. गॉडद त्यानंतर हा प्रकार पाहण्यासाठी बाहेर आले. पॉझिटिव्ह-निगेटिव्हचा प्रकार रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांना सांगितला मात्र, त्यांनी दुर्लक्ष करत बाळंतीणीची तपासणी सुरू केली. मात्र, तपासणी करत असताना रस्त्याशेजारीच ती प्रसुत झाली. तातडीने महिलेच्या भोवती कापडी स्टॅड उभे केले. बाहेरच तिला सलाईन लावले. बाळ व आई सुखरूप होते. मात्र तासाभरानंतर महिलेला पुढील उपचारासाठी गडहिंग्लजला पाठवण्यात आले. केवळ कोरोनाच्या भीतीपोटी कोणीही मदतीला पुढे येण्याचे धाडस दाखवले नाही.

@@AUTHORINFO_V1@@