कुटुंबापलीकडे विचार करा ; अन्यथा पक्ष इतिहासजमा होईल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Sep-2020
Total Views |

up congress_1  



उत्तरप्रदेश :
पक्षाच्या नेतृत्वातील बदलाबाबत २३ वरिष्ठ नेत्यांनी लिहिलेल्या पत्रावरून अद्याप कॉंग्रेसमधील वाद शांत झाला नाही. दरम्यान, यूपी कॉंग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या नऊ सदस्यांनी सोनिया गांधी यांना खुले पत्र लिहून नेतृत्वाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 


गेल्या वर्षी कॉंग्रेसच्या नऊ नेत्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले होते. त्यांनी अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले की, पक्षाला इतिहासजमा होण्यापासून वाचवावे. चार पानांच्या या पत्रात सोनिया गांधी यांना परिवाराच्या पुढे जाऊन निर्णय घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.यात म्हंटले होते कि 'कुटूंबाच्या मोहातून बाहेर पडत पक्षात लोकशाही परंपरा पुनर्स्थापित करावी.' माजी खासदार संतोषसिंग, माजी मंत्री सत्यदेव त्रिपाठी, माजी आमदार विनोद चौधरी, भूधर नारायण मिश्रा, नेकचंद पांडे, प्रकाश गोस्वामी आणि संजीव सिंह यांनी लिहिलेल्या या पत्रात म्हटले आहे की, उत्तर प्रदेश कॉंग्रेससाठी सध्याचा  काळ सर्वाधिक वाईट काळ आहे.


उत्तर प्रदेशच्या प्रभारी आणि काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांच्यावरदेखील पत्रातून अप्रत्यक्षपणे निशाणा साधण्यात आला आहे. सोनिया गांधींनी कुटुंबाच्या पलीकडे जाऊन विचार करावा. पक्षातील लोकशाहीची परंपरा पुन्हा जिवंत करावी, असे आवाहनच पत्रातून करण्यात आले आहे.


या पत्रात पुढे म्हटले आहे की, “राज्यातील कारभाराबद्दल केंद्रीय समितीकडून  तुम्हाला सद्य परिस्थितीची जाणीव करून दिली जात नाही अशी भीती व्यक्त केली जात आहे. आम्ही जवळजवळ एक वर्षापासून आपल्याला भेटण्यासाठी वेळेची मागणी करत आहोत, परंतु नकार दिला गेला आहे. वरिष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये संवादाचा अभाव असल्याचेही या पत्रात म्हटले आहे. या नेत्यांनी म्हटले आहे की, यूपीमधील एनएसयूआय आणि युवा कॉंग्रेस यांच्यात संवाद नाही. वरिष्ठ नेत्यांशी संवाद वाढविण्यासाठी कॉंग्रेस हाय कमांडला आवाहन करण्यात आले आहे. जर सध्याच्या घडामोडींकडे डोळेझाक केली गेली तर एकेकाळी पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या यूपीमध्ये कॉंग्रेसचे मोठे नुकसान होईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
@@AUTHORINFO_V1@@