पालघरमध्ये भूकंपाचे धक्के ; ४.० रिश्टर स्केलची नोंद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Sep-2020
Total Views |

Earthquake_1  H
 
 
पालघर : डहाणू, पालघर आणि तलासरी तालुक्यामध्ये भूकंपाचे धक्के बसल्याची घटना शुक्रवारी रात्री ११.३० ते ११.४५ च्या दरम्यान घडली. भूकंपाची तीव्रता ४.०, ३.६, २.८ रिश्टर स्केल इतकी नोंदविण्यात आली आहे. नोव्हेंबर २०१८ पासून या भागात भूकंपाचे धक्के बसण्याचे सत्र सुरू झाले आहे. पावसाळ्याच्या दरम्यान धक्के बसत नव्हते, मात्र गेल्या १५ दिवसांपासून हे सत्र पुन्हा सुरू झाल्याने या भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मध्यरात्रीच्या सुमारास अचानक भूकंपाचे धक्के जाणवल्याने भूकंपाच्या भीतीने नागरिक घराबाहेर पडले.
 
 
जिल्ह्यात वारंवार बसणाऱ्या भूकंपाच्या धक्क्याने डहाणू, तलासरी परिसर पुन्हा एकदा हादरला आहे. डहाणू, तलासरी भागात रात्री १०.३३ वाजता २.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा सौम्य भूकंपाचा धक्का बसला. मध्यरात्री ११.४१ वाजता ४.० रिश्टर स्केल तीव्रतेचा व १२.०५ वाजता ३.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा धक्का बसला. मध्यरात्री झोपेत असताना अचानक भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिक खडबडून जागे झाले व भीतीने घराबाहेर पडले होते. भूकंपामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही.दरम्यान, या भागात सारखा पाऊस सुरू होता. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उसंत घेतलीय. तसेच या भागातील धामणी, कवडास, कुर्झे येथील धरणे भरली असून काही धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यातच भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@