तैवानने चीनचं लढाऊ विमान पाडल्याचा संशय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Sep-2020
Total Views |

taiwan_1  H x W



नवी दिल्ली :
तैवानमध्ये चीनचे सुखोई विमान कोसळले आहे. तैवानच्या वायुदलाने चीनचे सुखोई-३५ विमान पाडल्याचा संशय सध्या व्यक्त करण्यात येत आहे. तैवानच्या हवाई हद्दीत चीनचे विमान घुसल्याने विमान पाडण्यात आले असल्याचा संशय व्यक्त होत आहे. हे विमान पाडण्यासाठी तैवानने अमेरिकी पेट्रियाट मिसाइल डिफेंस सिस्टमचा वापर करण्यात आला आहे. अद्याप घडलेल्या प्रकाराबाबत दोनही देशांकडून कोणत्याच प्रकारची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.



सध्या चीनचे शेजारील देशांसोबत तणावपूर्ण संबंध सुरु आहेत. अशातच तैवानसोबतही चीनच्या गेल्या बऱ्याच दिवसांपासून कुरघोडी सुरु आहेत. तैवानने चिनी विमानाला अनेकदा इशारा दिला. मात्र त्यानंतरही चीनचं युद्ध विमान तैवानच्या हद्दीत आल्याने तैवानने कारवाई केली, असा दावा केला जात आहे. या हल्ल्यात चिनच्या युद्धविमानातील वैमानिक जखमी झाला आहे, असंही सांगण्यात येत आहे. जर ही घटना घडली असेल तर येणाऱ्या काळात या दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य स्थिती तयार होण्याची शक्यता आहे.


कोणत्याही परिस्थितीचा सामना भारत सज्ज ; लष्कर प्रमुख नरवणेंचा चीनला इशारा


वास्तविक नियंत्रण रेषे(LAC)वर भारताचा चीनशी तणाव वाढत आहे. त्याचदरम्यान भारताचे लष्कर प्रमुख जनरल एम. एम. नरवणे म्हणाले की, भारताने आपली सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सीमेवर पर्याप्त सैन्य तैनात केलं आहे. लेह-लडाखला भेट देणारे जनरल नरवणे यांनी वृत्तसंस्था एएनआयशी बातचीत केली आहे. ते म्हणाले, चीनच्या सीमेवर तैनात असलेल्या भारतीय जवानांचा विश्वास दुणावलेला असून, कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी ते पूर्णपणे तयार आहेत.लष्कर प्रमुख म्हणतात, 'मी लेहला पोहोचलो आणि बर्‍याच ठिकाणी भेट दिली. मी अधिकारी व जेसीओशी बोललो व तयारीचा आढावा घेतला. जवानांचा आत्मविश्वास वाढलेला आहे आणि ते सर्व प्रकारच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार आहेत. ते म्हणाले, 'एलएसीची परिस्थिती थोडीशी तणावपूर्ण आहे. या परिस्थितीचा विचार करता आम्ही आमच्या सुरक्षिततेसाठी खबरदारी म्हणून जवान तैनात केले आहेत, जेणेकरून आपल्या सुरक्षिततेवर आणि अखंडतेवर परिणाम होणार नाही.
@@AUTHORINFO_V1@@