राष्ट्रवादी विचारांना फेसबुकचा विरोध !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Sep-2020
Total Views |

facebook_1  H x



फेसबुक इंडियामध्ये काँग्रेस आणि डाव्या विचारांच्या अधिकाऱ्यांचा भरणा; संसदीय समितीच्या बैठकीत आरोप


नवी दिल्ली : संसदेच्या माहिती व तंत्रज्ञानविषयक स्थायी समितीसमोर सुमारे तीन तासांच्या बैठकीत राष्ट्रवादी विचारसरणीविषयी फेसबुक करीत असलेला पक्षपात उघडकीस आला आहे. खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फेसबुकच्या भारतातील अधिकारी वर्गामध्ये प्रामुख्याने काँग्रेस आणि डाव्या विचारांशी घनिष्ठ संबंध असलेल्या व्यक्तींचा समावेश आहे. त्यांच्याकडून जाणीवपूर्वक उजव्या विचाराच्या गळचेपी करण्याचा प्रयत्न केला जातो. यामुळे फेसबुकवर भाजपचे नियंत्रण असल्याचा काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचा दावा उघडा पडला आहे.


फेसबुकवर भाजपचे नियंत्रण आहे, त्यामुळे जाणीवपूर्वक जातीय आणि धार्मिक द्वेष पसरविणारा मजकूर प्रसारित करण्यात येतो, असा आरोप राहुल गांधी यांनी नुकताच केला होता. त्यासाठी त्यांनी अमेरिकेतील एका वृत्तपत्रातील लेखाचा हवाला दिला होता.


त्यानंतर संसदेच्या माहिती व तंत्रज्ञानविषयक स्थायी समितीचे अध्यक्ष आणि खासदार शशी थरूर यांनीदेखील त्याविषयी काही टिप्पणी केली होती. त्यामुळे संसदीय समितीच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सदर समितीची बैठक बुधवारी सुमारे तीन तास चालली, यावेळी फेसबुकचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक अजित मोहन उपस्थित होते.




फेसबुक इंडियामध्ये काँग्रेसी आणि डाव्या विचारांच्या व्यक्तींचा भरणा

या बैठकीत फेसबुकचा पक्षपात पूर्णपणे उघडा पडल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. ते म्हणाले, फेसबुकच्या भारतातील अधिकारी वर्गांमध्ये डाव्या विचारांशी आणि काँग्रेससोबत घनिष्ठ संबंध असल्याचे आम्ही पुराव्यानिशी दाखवून दिले आहे. त्यामुळे या मंडळींकडून जाणीवपूर्वक राष्ट्रवादी विचारांची गळचेपी केली जाते. राष्ट्रवादी विचारांच्या लिखाणावर बंधने आणणे, तसे लिखाण करणाऱ्यांच्या फेसबुक खात्यांवर बंदी आणणे, बंधने आणणे असे प्रकार केले जातात. विशेष म्हणजे आमच्या आक्षेपांना खोडून काढणे बैठकीत उपस्थित असलेल्या फेसबुकच्या अधिकाऱ्यांना खोडून काढणे शक्य झाले नाही. त्यामुळे फेसबुकचा पक्षपात आता पुरता उघडा पडला आहे, असेही त्यांनी सांगितले.


बैठकीत फेसबुकचे अधिकारी पुरते उघडे पडलेले पाहून समितीचे अध्यक्ष शशी थरूर देखील एकटे पडले. त्यांनी बैठकीत फार काही बोलले नाहीत. सत्ताधारी पक्षाकडून ११ सदस्य आणि विरोधी पक्षाकडून ६ सदस्य होते. यावेळी सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी अनेक प्रश्न विचारले, त्यामध्ये जय श्रीराम म्हणणे हे फेसबुकच्या धोरणानुसार जातीय तणाव वाढविणारे आहे का, राष्ट्रवादी विचारांशी संबंधित तब्बल ७०० पेजेस फेसबुकने हटविले का, फेसबुकच्या अधिकाऱ्यांचे काँग्रेस नेते अहमद पटेल यांच्याशी काय संबंध आहेत अशा तिखट प्रश्नांचा सामना फेसबुकच्या अधिकाऱ्यांना करावा लागला.





@@AUTHORINFO_V1@@