'मुंबईत येताच कंगनाचं थोबाड फोडणार' ; शिवसेना नेत्याचं वक्तव्य

    04-Sep-2020
Total Views |

kangana ranaut_1 &nb



मुंबई :
मुंबई आणि मुंबई पोलिसांबाबतच्या वक्तव्यावरून संताप व्यक्त केला जात आहे. अशातच “मी ९ सप्टेंबरला मुंबईत येत आहे, कोणाच्या बापात हिंमत असेल तर थांबवा” अशा शब्दांत कंगनाने ट्विटरवरुन चॅलेंज दिले आहे. “बरेच जण मला मुंबईला परत न येण्याची धमकी देत ​​आहेत, म्हणून मी आता येत्या आठवड्यात ९ सप्टेंबरला मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला आहे. मी मुंबई विमानतळावर किती वाजता उतरणार याची वेळ लवकरच सांगेन. कोणाच्या बापात हिंमत असेल तर थांबवा” असा एल्गार कंगनाने केला. मात्र यानंतर शिवसेना नेत्यांकडून कंगना इथे आली तर आमच्या रणरागिणी तिचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी दिला.


यापूर्वीही, शिवसेना नेते संजय राऊत यांनी देखील आपल्याला धमकी दिली असल्याचा दावा कंगनाने केला होता. त्यानंतर आता कंगनाला खासदार संजय राऊत यांनी सौम्य शब्दांत समज दिली.ती इथे आली तर आमच्या रणरागिणी तिचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाहीत. उद्योजक व सेलेब्रिटी घडवणाऱ्या मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगनावर देशद्रोही म्हणून गुन्हा दाखल करण्याची मी गृहमंत्र्यांना मागणी करणार आहे. असे वक्तव्य शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी ट्विटवरून केले आहे.