मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षणामध्ये मराठीचा वापर !

    30-Sep-2020
Total Views |

MI_1  H x W: 0  
मुंबई : एकीकडे महाराष्ट्रमध्ये मराठी भाषेच्या वापरावर अनेक जणांनी पुढाकार घेतला. महाराष्ट्रात प्रत्येकाला मातृभाषा मराठीचे ज्ञान हवे अशी मागणी धरली. मात्र, कौतुकास्पद बाब म्हणजे आयपीएल २०२० दुबईत होत असताना तिथे चक्क खेळाडूंना मराठीमध्येही प्रशिक्षण दिले जात आहे. मुंबई इंडियन्स संघाचा प्रशिक्षक झहीर खान हा गोलंदाज दिग्विजय देशमुखला मराठीमध्ये प्रशिक्षण देताना दिसत आहे. मुंबई इंडियन्स संघाच्या ट्विटरवरून हा व्हिडियो शेअर केला असून सोशल मिडीयावर त्याचे कौतुक होत आहे.
 
 
 
 
 
आयपीएल २०२०चे आयोजन दुबईमध्ये करण्यात आले आहे. आत्तापर्यंत ११ सामने झाले असून सध्या राजस्थान, दिल्ली, पंजाब हे संघ पहिल्या ४मध्ये आहेत. त्यानंतर मुंबई इंडियन्स सध्या पाचव्या स्थानावर आहे. मात्र, संघाने शेअर केलेल्या एका व्हिडियोमध्ये मुळचा अहमदनगरचा असलेला झहीर हा दिग्विजयला गोलंदाजीचे धडे देताना दिसत आहे. विशेष म्हणजे दोघांचे संभाषण हे मराठीतून चालले आहे. त्यांच्या या मराठी प्रेमाचे ट्विटरवर चांगलेच कौतुक होत आहे. विशेष म्हणजे, दिग्विजय देशमुख याने अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्यासमवेत ‘काय पो छे’ या चित्रपटातदेखील काम केले आहे.