पत्रकार पांडुरंग रायकर मृत्यू प्रकरणाची चौकशी होणार!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Sep-2020
Total Views |

Pandurang raikar_1 &



आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले चौकशीचे आदेश!


मुंबई : योग्य वेळी योग्य उपचार मिळाले नाहीत म्हणून पुण्यातील एक तरूण पत्रकार पांडुरंग रायकरचा हाकनाक बळी गेला. पांडुरंगला अ‍ॅम्ब्युलन्स मिळाली नाही, ऑक्सिजन मिळाला नाही, त्यामुळे एक तरूण पत्रकार आपल्याला सोडून गेला. व्यवस्थेच्या या गलथान कारभाराची आता चौकशी होणार आहे. तसे आदेश आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.


श्रीमंत लोक दबाव आणून आयसीयूतील बेड अडवून ठेवतात, हे भीषण वास्तव पत्रकारांशी बोलताना राजेश टोपे यांनी मान्य केले आहे. यावर जिल्हाधिकारी यांनी याकडे लक्ष दिले पाहिजे अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत.


माध्यमकर्मी हे कोरोना योद्धे असतील तर त्यांच्यासाठी सरकारी आणि चॅरिटी कमिशनर अंतर्गत येणाऱ्या खासगी रुग्णालयात पत्रकारांसाठी ऑक्सिजनसह काही बेड राखीव ठेवले जावेत अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेने मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांकडे केली आहे. राज्यात आतापर्यंत किमान शंभरावर पत्रकार कोरोना बाधित झाले आहेत आणि मराठी पत्रकार परिषदेकडे जी माहिती उपलब्ध झालेली आहे त्यानुसार अकरा पत्रकारांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. सध्याच्या महामारीत योग्य वेळी योग्य उपचार मिळणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे, तसाच पत्रकारांचाही आहे. तो मिळत नसेल आणि केवळ गलथानपणामुळे पत्रकारांचे बळी जात असतील तर ते निषेधार्ह आहे.


पांडुरंग रायकर मृत्यू प्रकरणाची चौकशी होऊन दोषींवर कारवाई होणार असेल तर त्याचे स्वागतच आहे. मात्र पुन्हा अशी वेळ कोणत्याही पत्रकारावर येणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी, असे मत मराठी पत्रकार परिषदेचे मुख्यव विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी व्यक्त केले आहे.




@@AUTHORINFO_V1@@