स्टेंटचा पुरवठा घटला! सरकारचा कारवाईचा इशारा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Sep-2020
Total Views |

stent_1  H x W:
नवी दिल्ली : हृदयविकार शस्त्रक्रीयेसाठी वापरल्या जाणाऱ्या स्टेंटच्या किमती कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने कंपन्यांना कडक इशारा दिला आहे. डिपार्टमेंट ऑफ फॉर्मास्युटिकल्सतर्फे (डीओपी) देशभरात स्टेंट पुरवठा करणाऱ्या एकूण ६२ कंपन्यांना पत्र लिहीत याबद्दल ड्रग्ज प्राईस कंट्रोल ऑर्डर लागू करण्याचा इशारा दिला आहे. तसेच पुरवठ्यात घट होता कामा नये, असा इशाराही सरकारने दिला आहे.
 
 
केंद्र सरकारद्वारे हृदयविकार शस्त्रक्रीया एंजियोप्लास्टीमध्ये वापरात येणाऱ्या स्टेंटच्या किंमतीत ८५ टक्के घट करण्याचा सर्वहिताचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर रुग्णालयांमध्ये स्टेंटचा तुडवडा जाणवू लागत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. त्यानंतर केंद्राच्या अखत्यारीत असलेल्या डीओपी या संस्थेने कडक इशारा देत निर्मात्या कंपन्यांना पत्र पाठवले आहे.
 
 
अबॉट इंडिया प्राइवेट लिमिटेड, टर्मो इंडिया प्रा. लि., बॉस्टन साइंटिफिक, बॉयोट्रॉनिक मेडिकल डिवाइस प्रा. लि., इंडिसा मेडट्रॉनिक प्रा. लि., ट्रांसलुमिना थेराप्यूरिक्स एलएलपी आणि मेरिल लाइफ साइंस प्रा. लि. अशा ६२ कंपन्यांना हे पत्र पाठवण्यात आले आहे. या इशाऱ्यानंतर पुन्हा देशभरात स्टेंट कमी असल्याच्या तक्रारी जाणवू लागल्यास सरकार पुढील कठोर पावले उचलणार असल्याचेही पत्रात म्हटले आहे.
 
 
डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकलने अबॉट हेल्थ केयर या कंपनीला लिहीलेल्या पत्रात म्हटले आहे की, स्टेंटबबद्ल बाजारातून आणि रुग्णालयांतून तुटवड्याच्या तक्रारी वारंवार येत आहेत. स्टेंटचा पुरवठा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी सरकारने डीपीसीओ-२०१३ अंतर्गत कलम ३.१ याचा वापर करून आपल्या अधिकाराचा वापर करेल. स्टेंटच्या तुटवड्यामुळे सरकारने ड्रग्ज प्राईस कंट्रोल ऑर्डर लागू केली आहे.
 
 
 
काय आहे सरकारचा अधिकार ?
डीपीसीओ-२०१३च्या कलम ३.१ अंतर्गत अधिकार वापरून सरकार जनहितासाठी मागणीनुसार औषध निर्मिती वाढवण्याचा निर्देश देऊ शकते. स्टेंटबद्दलही हा कायदा लागू केला जाऊ शकतो. या संदर्भात ७ मार्च रोजी एक बैठक होणार असून स्टेंटच्या किंमतींबद्दल पुढील निर्णय घेतला जाऊ शकतो.
 
 
हृदयरोग शस्त्रक्रीया टळल्या
स्टेंटच्या किंमती कमी झाल्यानंतर कित्येक कंपन्यांनी पुरवठादारांकडून नव्या किंमती छापण्याच्या बहाण्याने स्टेंट मागवून घेतल्या. त्यानंतर पुन्हा कंपन्यांनी साठा उपलब्ध नसल्याचे सांगितले, असा आरोप लावण्यात आला आहे. स्टेंटच्या किमती कमी झाल्या तरी रुग्णांचे हाल संपलेले नाहीत. त्यांना बाजारातून चढ्या दरात स्टेंट विकत घ्याव्या लागत आहेत. हा काळाबाजार रोखण्यासाठी सरकारी नियंत्रक संस्था एनपीपीएने रुग्णालये,पुरवठादार कंपन्या तसेच उत्पादकांना इशारा दिला आहे. तरीही याबद्दल हलगर्जीपणा केला जात आहे. याच कारणाने कित्येक हृदयरोग शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत.



@@AUTHORINFO_V1@@