कोरोना अपडेट्स : कल्याण-डोंबिवलीकरांना दिलासा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Sep-2020
Total Views |
KDMC_1  H x W:


पहिला रुग्ण आला होता अमेरिकेहून त्यानंतर...

डोंबिवली (जान्हवी मोर्ये) : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रतील नव्याने आढळून येणा:या कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसली तरी कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ८७ टक्के आहे. ही समाधानकारक बाब असली तरी कोरोना रुग्ण नव्याने आढळून येण्याचे प्रमाण शून्यावर येणो गरजेचे आहे. जोर्पयत हे प्रमाण कमी होत नाही. तोर्पयत शहरात कोरोना भयाचे वातावरण कायम राहणार आहे.
 
 
मार्च महिन्यात महापालिका हद्दीत पहिला रुग्ण आढळून आला. हा रुग्ण अमेरीकेहून कल्याणमध्ये आला होता. त्याला त्याच्या पत्नीसह तीन वर्षाच्या मुलीला कोरोनाची लागण झाली होती. तेव्हापासून महापालिका हद्दीत कोरोना रुग्ण आढळून येत आहे. कालच्या तारखेर्पयत महापालिका हद्दीत ४१ हजार १२६ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी केवळ ४ हजार ५१० रुग्ण सध्या उपचार घेत आहेत.
 
उर्वरीत ३५ हजार ८१० रुग्ण हे कोरोना मुक्त झाले आहेत. त्यांनी कोरोनावर मात केली आहे. महापालिका हद्दीतील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर हा ८७ टक्के आहे. देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचे सगळ्य़ात जास्त प्रमाण हे शेजारच्या उल्हासनगर महापालिकेत आहे. मात्र कल्याण डोंबिवली महापालिका ही त्या महापालिकेशी बरोबरी साधण्याच्या जवळपास आहे.
 
 
महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांचा मृत्यू दर हा दोन टक्केच्या आत आहे. अन्य महापालिकांच्या तुलनेत हा सगळ्य़ात कमी मृत्यूदर आहे असा दावा  कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाकडून केला जात आहे. तरी देखील महापालिका हद्दीत आत्तार्पयत ८०६ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
 
 
आरोग्य व्यवस्था होती अपुरी
 
कल्याण डोंबिवली महापालिकेची केवळ दोन मोठी रुग्णालये होती. रुक्मीणीबाई व शास्त्रीनगर रुग्णालयात अपुरी आरोग्य व्यवस्था असल्याने महापालिकेने सगळ्य़ात प्रथम तीन खाजगी रुग्णालये अधिग्रहीत करुन कोरोना रुग्णावर उपचार सुरु केले. त्यानंतर जंबो कोविड केअर सेंटर व रुग्णालये उभारण्याचे काम सुरु केले. आजच्या घडीला कल्याण डोंबिवली महापालिकेने एकाच दिवसात 9 टक्के कोरोना रुग्ण आढळून आले तरी त्यांच्यावर उपचार करण्यासाठी तितके बेड उपलब्ध असलेले कोविड रुग्णालये सुरु केलेली आहेत. त्यावर महापालिकेने आत्तार्पयत ३५ कोटी पेक्षा जास्त खर्च केला आहे. येत्या वर्षभरात कोविड प्रादूर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने २१४ कोटीच्या निधीचा मागणी राज्य सरकारकडे केली आहे.
 
 
४ लाख ७६ हजार घरांचे सव्रेक्षण होणार
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील कोरोना रुग्णांची संख्या जुलै महिन्यात वाढली होती. तेव्हा महापालिकेने पुन्हा १७ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला होता. कोरोना रुग्णांची संख्या लॉकडाऊनमुळे स्थिरावली. त्यानंतर गणोशोत्सव काळात पुन्हा कोरोना रुग्ण वाढले. त्यावर मात करण्यासाठी धारावी पॅटर्न सुरु केला. कोविड फॅमिली डॉक्टर मोहिम राबविली. या सगळ्य़ा प्रयत्नानंतरही कोरोना रुग्ण आढळून येण्याची संख्या काही कमी होत नाही. त्यामुळे आत्ता ख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम राबविली जात आहेत. या मोहिमे अंतर्गत ४ लाख ७६ हजार घरांचे सव्रेक्षण करण्यात येणार आहे. त्यामुळे एकाही घरात कोरोनाचा रुग्ण लपून राहू शकत नाही असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
 
 
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी तयार !
 
माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत सव्रेक्षण सुरु करण्यात आलेले असताना आत्ता मुख्यमंत्र्यांनी कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याचे सूचित केले आहे. त्यामुळे कोरोना रुग्ण कमी होण्याऐवजी वाढतील असेच यातून स्पष्ट होत आहे.
@@AUTHORINFO_V1@@