जाहिरात क्षेत्रात करिअर करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Sep-2020
Total Views |
Gopi Kukde _1  
 


ब्रॅण्डगुरू गोपी कुकडे सरांचे मार्गदर्शन


मुंबई : जाहिरात हे जगाच्या कुठल्याही कोपऱ्यावर अबाधित आणि कायम असलेलं क्षेत्र. हे विश्व मोठं असल्याने नोकरी व्यवसायाच्या संधीही तितक्याच अफाट आणि वेगवेगळ्या आहेत. मात्र, नेमकी सुरुवात कशी करावी याच अडचणीमुळे स्वतःमध्ये कौशल्य असूनही अनेकांची संधी हुकते. मात्र, ब्रॅण्डगुरु गोपी कुकडे यांनी जाहिरात (अॅडर्व्हटायझिंग) क्षेत्रात नवनव्या संधी शोधणाऱ्या विद्यार्थ्यांना अचूक आणि नेमके मार्गदर्शन करण्यासाठी मंच उपलब्ध केला आहे. इच्छुकांना या झूम मिटींग वेबिनारद्वारे ब्रॅण्डगुरू गोपी कुकडे सरांचे मार्गदर्शन मिळणार आहे. या वेबिनारसाठी नावनोंदणीही सुरू झाली आहे. 
 
 
 
जाहिरातीची गरज काय ? जाहिरात एजन्सी कशी काम करते?, मार्केट रिसर्च म्हणजे काय ?, जाहिरात क्षेत्रातील P to I म्हणजे काय ?, अकाऊंट सर्व्हीसिंग म्हणजे काय ?, कॉपी रायटरचे काम काय ?, जाहिरात क्षेत्रातील कला दिग्दर्शकाची कामे आणि भवितव्य आदी गोष्टींची माहिती आणि अनुभव विद्यार्थ्यांना ऐकता येणार आहे. या शिवाय या क्षेत्रातील महत्वाचे आणि नोकरीच्या संधीसाठी आवश्यक असलेले मीडिया प्लानिंग, फोटोग्राफी, इल्युस्ट्रेशन, कॅलिग्राफी, अॅनिमेशन, इमेज एडीटींग, मॉडेल कॉर्डिनेशन, लोकेशन कॉर्डीनेशन, ऑनलाईन आणि ऑफलाईन एडीटींग, व्हॉईस ओव्हर आदी गोष्टींचीही माहिती ब्रॅण्डगुरू गोपी कुकडे सरांमार्फत देण्यात येणार आहे.
 
 
 
थ्री डी (3D) , जाहिरातीचे प्रकार, सोशल मीडियावरील जाहिराती, 1994 पूर्वीच्या जाहिराती आणि आत्ता घडत असलेले बदल याबद्दलची विस्तृत माहिती गोपी कुकडे यांच्यामार्फत दिली जाणार आहे. यात सहभागी होण्यासाठी किमान जाहिरात क्षेत्रातील मुलभूत ज्ञान आवश्यक आहे. याबद्दलची विस्तृत माहिती पुढील प्रमाणे :
 
 
शुल्क (फी) : 4999/- रुपये
 
दिनांक : 12 ऑक्टोबर, 13 ऑक्टोबर, 19 ऑक्टोबर, 20 ऑक्टोबर, 26 ऑक्टोबर, 27 ऑक्टोबर (सहा दिवस)
 

वेळ : सायंकाळी 7 ते 8 वाजेपर्यंत (1 तास)
 
या वेबिनारबद्दल नावनोंदणी आणि अधिक माहितीसाठी +91 93562 21348 या क्रमांकावर कॉल / व्हॉटसअॅप करा. अन्यथा [email protected] या  ईमेल आयडीवर संपर्क करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. 
 
 
 

Gopi Kukde _1   
 
 
@@AUTHORINFO_V1@@