'शेतकरी ज्याची पूजा करतो, विरोधकांनी त्यालाच आग लावली'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Sep-2020
Total Views |

narendra modi_1 &nbs


नवी दिल्ली :
सुधारित कृषी कायद्याला विरोध करणाऱ्या विरोधकांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सडकून टीका केली आहे. विरोधी पक्ष केवळ विरोधासाठी विरोध करत असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांना अधिकार देत आहे, त्यांना स्वतंत्र करत आहेत तरीही लोक विरोध करत आहेत. विरोधी पक्ष हे ना शेतकऱ्यांसोबत आहेत, ना जवानांसोबत आहेत, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी विरोधी पक्षांवर टीका केली आहे.





गंगा स्वच्छता अभियान हा मुद्दा मोदी सरकारच्या कार्यक्रमातील महत्वांच्या मुद्द्यांपैकी एक आहे. पंतप्रधान मोदींनी मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने 'नमामी गंगे मिशन'अंतर्गत उत्तराखंडमध्ये सहा मोठ्या प्रकल्पांचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी कृषी विधेयकावरून देशभरात सुरू असलेल्या विरोधकांच्या विरोधावरही त्यांनी हल्ला चढवला. देशातील शेतकरी खुल्या बाजारात आपले पीक विकू नये असेच विरोधी पक्षाला वाटत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. शेतकरी ज्या साधनांची पूजा करतात, त्या साधनांना आग लावून विरोधक शेतकऱ्यांचा अपमान करत आहेत. आम्ही एमएसपी लागू करू असे हे लोक अनेक वर्षे बोलत राहिले, मात्र त्यांनी लागू केलाच नाही. मात्र एमएसपी लागू करण्याचे काम स्वामीनाथन आयोगाच्या इच्छेनुसार आमच्या सरकारने केले असे पंतप्रधान मोदी म्हणाले. हे लोक आज एमएसपीबाबतही लोकांमध्ये संभ्रम पसरवत आहेत. देशात एमएसपीदेखील राहील आणि शेतकऱ्यांना देशात कोणत्याही ठिकाणी आपले पीक विकण्याचे स्वातंत्र्य असेल असेही पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले. मात्र हे स्वातंत्र्य काही लोकांना मात्र सहनच होत नसल्याचा टोला त्यांनी विरोधी पक्षाला लगावला.नव्या कायद्यामुळे यांच्या काळ्या कमाईचा मार्गच बंद झालेला असल्याचे ते म्हणाले. याच मुळे विरोधक त्रस्त असल्याची टीकाही त्यांनी केली.


ट्रॅक्टरला आग लावून व्यक्त केला होता निषेध


दिल्लीच्या उच्च सुरक्षा विभागाअंतर्गत येणाऱ्या इंडिया गेटजवळ काही लोकांनी ट्रॅक्टरला आग लावल्याची घटना घडली होती. कृषी विधेयकाविरोधात आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरला आग लावून त्यांनी निषेध व्यक्त केला आहे. सोमवारी (२८ सप्टेंबर) सकाळी इंडिया गेटजवळ ही घटना घडली आहे.
@@AUTHORINFO_V1@@