कर्मचाऱ्यांनी आकाशात उडत कामावर यायचं का ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Sep-2020
Total Views |

mns vs uddhav thackeray_1



मुंबई :
अनलॉकचा चौथा टप्पा ३० सप्टेंबरला संपून १ आॅक्टोबरपासून पाचव्या टप्प्याला सुरूवात होणार आहे. राज्यातील हॉटेल व रेस्टॉरंट सुरू करण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे तयार झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे. रेल्वे सेवा बंद असताना हॉटेल सुरू करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाच्या अनुषंगाने मनसेने सरकारवर जोरदार टीका केली आहे.


राज्यातील औरंगाबाद, पुणे, मुंबई आणि नागपूर येथील रेस्टॉरंट व्यवसायिक संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत सोमवारी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. या बठकीत एसओपीचे पालन, स्वच्छता, सुरक्षितता, शारीरिक अंतर पाळणे ही या सर्व बाबींचा विचार करून सर्वांनी एकत्रित बसून मार्गदर्शक तत्वे अंतिम करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. मार्गदर्शक तत्वे अंतिम झाल्यानंतर रेस्टॉरंट सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल,' असेही मुख्यमंत्र्यांनी रेस्टॉरंट संघटनांच्या प्रतिनिधींसोबतच्या बैठकीत सांगितले.


मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून याबाबत भाष्य केलं आहे. 'अनलॉक ५ सुरू होणार आहे. त्या अंतर्गत उपहारगृहे सुरू होणार आहेत. पण तिथे काम करण्याऱ्या कर्मचाऱ्यांची वाहतूक व्यवस्था काय? त्यांनी आकाशात उडत कामावर यायचं का?,' असा प्रश्न देशपांडे यांनी केला आहे. राज्य सरकारने लोकल सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मनसेची मागणी आहे. त्यासाठी मनसेने काही दिवसांपूर्वीच सविनय कायदेभंग आंदोलनही केले होते. मात्र, सरकारने त्यास दाद दिली नाही. त्यामुळे आता रेस्टॉरंट सुरू करण्याच्या सरकारच्या निर्णयावर देशपांडे यांनी संताप व्यक्त केला आहे. राज्यात अनलॉक होत असताना मेट्रो व रेल्वे वाहतूक अद्याप सुरू झालेली नाही. मुंबईसारख्या शहरात याचा मोठा फटका लोकांना बसत आहे. कंपन्या व कार्यालयं सुरू असूनही लोकांना कामावर जाण्यासाठी मोठ्या त्रासाचा सामना करावा लागतोय. बेस्ट बस सुरू असली तरी तिला मर्यादा आहेत. लोकलअभावी बसमध्ये मोठी गर्दी होत आहे. त्यातून करोनाच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे.
@@AUTHORINFO_V1@@