बलात्कार पीडितेची झुंज संपली : कुटूंबाचे 'जगणे' नावाचे युद्ध सुरू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Sep-2020
Total Views |
news_1  H x W:


हाथरस बलात्कार प्रकरण - जीभ कापली, कणा मोडला, शरीरावर भळभळत्या जखमा

 
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या हाथरस जिल्ह्यात सामुहिक बलात्कार पीडितेची झुंज अखेर संपली. मंगळवारी रात्री ३ वाजता दिल्लीतील सफदरगंज रुग्णालयात तिने अखेरचा श्वास घेतला. १४ सप्टेंबर रोजी क्रुरकर्म्यांनी तीची जीभ कापून टाकली होती. पाठीचा कणा तोडला होता. बाजरीच्या शेतात ती बेशुद्ध अवस्थेत आढळली होती. सोमवारी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात तिला हलवण्यात आले होते.
 
 
 दिल्लीतील या रुग्णालयाबाहेर आता आंदोलन सुरू आहे. पीडितेने प्राण सोडले त्यापूर्वीही अशीच गर्दी होती. कोपऱ्यात एक वृद्ध व्यक्ती खिन्न चेहऱ्याने बसले होते. सभोवताली माणसे जमली होती. काही जण सांत्वन करत होते. काही जण त्यांची मुलगी यातून सावरून बाहेर येईल, असे सांत्वन करत होते.
 
 
 
दोन आठवड्यापूर्वी नराधमांनी तिच्यावर हाथरस जिल्ह्यातील गावात सामुहिक बलात्कार केला होता. रुग्णालयात व्हेंटीलेटरवर असलेल्या मुलीची वाट पाहत असलेला बाप कसा असेल याची कल्पनाही करवत नाही. पीडितेची जीभ कापून टाकण्यात आली. शरीरावरही गंभीर जखमा आहेत. पाठीचा कणा मोडला, ओढणीने गळा आवळला आणि ती मृत झाल्याचे वाटून तिथेच टाकून नराधमांनी पळ काढला. या प्रकारामुळे हाथरस हा जिल्हा देशाच्या केंद्रस्थानी चर्चेत आला. 
 
 
 
उपचारादरम्यान, तिच्या जवळ कुणीच नव्हते. तिचा लहान भाऊ दोन आठवडे तिची रुग्णालयात शुश्रूशा करत होता. त्याला दिल्ली पोलीसांच्या जवानांसह गेला होता. रुग्णालयात सुरक्षा आहे की नाही हे पाहण्यासाठी पोलीस अधिकारी येतून गेले. वडील मुलीच्या अशा मरण यातना पाहत एका भीतीला पाठ टेकून बसले आहेत. सांत्वन करण्यासाठी आलेले लोक काय सांगतात याकडेही त्यांचे लक्ष नाही.
 
 
पत्रकार विचारपूस करण्यासाठी जातात. त्यांच्या शेजारी बसतात. मात्र, मुलीचा उल्लेख केल्यावर बापाच्या डोळ्यातील अश्रू थांबत नाहीत. चेहऱ्यावर मास्क लावले आहे. मात्र, डोळ्यातून एक हरलेला बाप स्पष्ट दिसतो. सोबत एक भीतीही कायम आहे. आरोपी गावातील ठाकूर आहेत. त्यांनी माझ्या वडिलांशीही असाच व्यवहार केला आहे. वडिलांच्या हाताची बोटे कापली आहेत. आम्हाला घाबरवणं, धमकावणं सुरूच असतं. आज आमच्या मुलीवर अत्याचार केला आहे.
 
 
बोलता बोलता अचानक गप्पही होऊन जातो. भीती मात्र, कायम असते. आजूबाजूचे लोक धीर देण्याचा प्रयत्न करतात. मात्र, एक हरलेला बाप आणखी किती धीर धरेल. अशातच धाकटा मुलगा तिथे धावत येतो. दुपारपासून कागदपत्रांच्या गराड्यात रुग्णालयाच्या चकरा मारता मारता त्याचा फोनही चार्ज करावा याचेही भान त्याला राहत नाही. कुटूंबातली माणसं, गावातील माणसं आणि पत्रकार केवळ त्या मुलीची प्रकृती विचारण्यासाठी त्याला विचारणा करू लागतात. हाथरस ते दिल्ली प्रवास हा कुटूंबासाठीही तितकाच वेदनादायी आहे हे त्यांच्याकडे पाहिल्यावर दिसून येते. 
 
 
बहिणीच्या मृत्यूपूर्वी भावाने दिलेली प्रतिक्रीया फारच सुन्न करणारी आहे. तो म्हणतो, मी गेल्या १२ दिवसांपासून घरी गेलेलो नाही. बहिण काही बोलत नाही. फक्त डोळ्यांनी माणसं ओळखते. कधी कधी इशारा करते. तिचे हाल आता पाहावत नाही. तिचा आवाज ऐकायचा आहे. पण काहीच बोलत नाही. मृत्यूशी झुंज देत आहे.


धाकटा भाऊ नोएडाला काम करतो. हाथरस येथे घरी फोन करायचा पण तिच्याशी जास्त बोलणं व्हायचं नाही. कधी फोन केला तर सतत कामात व्यस्त असायची. आता बोलायचा प्रयत्न करतोय तर ती बोलू शकत नाही. तिची जीभ नराधमांनी कापली आहे. गेले १३ दिवस हाथरस येथून काही अंतरावर असणाऱ्या अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या मेडीकल महाविद्यालयात इलाज केल्यानंतर रुग्णालयाने सोमवारी तिला दिल्लीला हलवले.

१४ सप्टेंबर रोजी काय झाले ?
 
कुटूंबाने दिलेल्या माहितीनुसार, १४ सप्टेंबर रोजी पीडित मुलगी आणि तिचा मोठा भाऊ आणि आई गावात गवत कापण्यासाठी गेल्या होत्या. एक गठ्ठा बांधून झाला तेव्हा भाऊ घरी ती घेऊन घरी आला. आई आणि मुलगी शेतात एकटेच होते. आई पुढे गवत कापत होती. मुलगी मागे गवत भरत होती. याच दरम्यान, चार नराधमांनी पीडितेच्या गळ्यातील ओढणी खेचून घेतली. तिच्यावर अतिप्रसंग केला.
 
 
त्या दिवसाबद्दल भाऊ सांगतो, आईने शोधाशोध सुरू केली. आवाज दिला मात्र, तिचा काहीच प्रतिसाद आला नाही. काही ठिकाणाहून पुढे गेल्यानंतर तिला चप्पल दिसली. तिथे शेतात पीडित मुलगी बेशुद्ध अवस्थेत दिसली. आईने आरडाओरडा सुरू केला तेव्हा गावातील काही जण तिथे आले. चेहऱ्यावर पाणी मारून उठवण्याचा प्रयत्न केला पण काहीच फायदा झाला नाही.
 
 
 
भाऊ लगेचच पोलीस ठाण्यात गेला. मात्र, आरोपी कोण, त्यांची माहिती काय कुणालाच सांगता आली नाही. ते लोग तिथे वारंवार फिरत होते. मात्र, आई आणि मुलीला त्या गोष्टीची जाणीव झालेली नाही. पोलीसांच्या भूमिकेवरही प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात नाही. हाथरस पोलीसांनी या प्रकरणी संदीप, रामकुमार, लवकुश आणि रवि या चौघांना अटक केली आहे. पोलीसांनी या प्रकरणी गंभीर गुन्हे दाखल केल्याचा दावा केला आहे. मात्र, कुटूंबियांनी पोलीसांनी हलगर्जीपणा केल्याचे म्हटले आहे.
 
 
 
सध्या या प्रकरणी रुग्णालयाच्या आवारात पीडितेच्या वडिलांनी आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार तिचे शव हे रुग्णालयातून हलवण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आम्हाला पूर्वकल्पना न देता ही कार्यवाही कशी केली, असा प्रश्न विचारला आहे. सध्या रुग्णालयाच्या आवाराबाहेर खूप गोंधळ गर्दी आणि आंदोलकांचा जमाव आहे. कोरोना महामारी सुरू असताना अशाप्रकारे रुग्णालयाबाहेर गर्दी चिंताजनक बाब आहे. त्याहूनही धक्कादायक म्हणजे पीडितेवर झालेला अन्याय.


@@AUTHORINFO_V1@@