कोरोनाचा कहर (भाग- २७)- ‘कोरोना’ व्हायरस आणि मानसिकता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Sep-2020
Total Views |


safs_1  H x W:
 

कोरोनाच्या साथीमुळे लोकांना जे नैराश्य व उदानसिनता आली आहे, त्याच्या मुख्य कारणांपैकी एक कारण म्हणजे विलगीकरण म्हणजेच ‘क्वारंटाईन.’ हल्लीच्या जगात जेथे सर्वत्र जलद दळणवळण तसेच, व्यक्त होण्याच्या अनेक वाटा किंवा मार्ग उपलब्ध असताना, एखाद्याला जर बरेच दिवस एकटे राहावे लागत असेल, तर त्यांच्या मनावर व नंतर पर्यायाने शरीरावर किती विपरीत परिणाम होत असेल, याचा विचार करा. एखादा कणखर माणूस हा परिणाम सहज निभावून नेऊ शकतो. परंतु, संवेदनशील माणसांच्या मनावर याचा फार विपरीत परिणाम होऊ शकतो.


विलगीकरणात राहण्याने काही लोकांना अगदी अनपेक्षितपणे नैराश्य आले. एकटेच राहिल्यामुळे एकप्रकारची हतबलता (helplessness) आली. या विलगीकरणामुळे तयार झालेल्या लक्षणांचा अभ्यास केला असता खालीलप्रमाणे मुख्य लक्षणे दिसू लागतात.


भयगंड, चिडचिडेपणा, निद्रानाश, चित्त एकाग्र न होणे, कार्यशक्तीचा अभाव, काम करण्यात होणारी टाळाटाळ, अचानकपणे एकटे पडल्याची भावना, कामाचा किंवा ऑफिसचा प्रचंड ताण आल्यामुळे होणारी चलबिचल.


माझ्या पाहण्यात तर काही रुग्ण असे आहेत की, त्यांना ‘क्वारंटाईन’नंतर आपली नोकरी टिकेल की नाही, याची प्रचंड चिंता भेडसावत होती. मी स्वत: एक महिना शासनाच्या कोरोना रुग्णालयामध्ये काम केले आहे. एक हजार कोरोनाबाधित रुग्णांमध्ये काम केल्यावर स्वत:ला एक महिना विलगीकरणात ठेवले होते. त्यावेळी होणारी मनाची चलबिचलता मी अनुभवली आहे. असो.

 

saf_1  H x W: 0 

वरील आकृतीमध्ये दिल्याप्रमाणे माणसाची निरोगी जीवनशैली ही अनेक प्रकारे विचलित होऊ शकते व जर या जीवनशैलीला आपण सकारात्मकतेची जोड दिली, तर ही जीवनशैली प्रभावी पद्धतीने परत निरोगी होऊ शकते. परंतु, जर या निचलित झालेल्या जीवनशैलीला चुकीच्या व नकारात्मक गोष्टींची साथ मिळाली, तर मात्र या जीवनशैलीला ग्रहण लागते व ‘सायकॅट्रिक डिसिजेस’ म्हणजेच मानसिक आजार तयार होतात. ’कोविड-१९’ मुळे या जीवनशैलीचे अपरंपार नुकसान झाले आहे. आपण पुढील भागात हे नुकसान कसे भरून काढता येईल ते पाहूया.
 

- डॉ. मंदार पाटकर
(लेखक एम.डी होमियोपॅथी आहेत.)

@@AUTHORINFO_V1@@