'शासनमान्य आजारात कोरोना चा समावेश व्हावा'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Sep-2020
Total Views |

niranajan davkhare_1 


डोंबिवली :
अनुदानित संस्थांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना व राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती योजना लागू आहे. शासनाने मान्यता दिलेल्या आजारांमध्ये अनेक आकस्मिक व गंभीर स्वरूपाच्या आजारांचा समावेश असून ह्या आजारामध्ये कोरोना संसर्गाचाही समावेश करून कोरोनाग्रस्त शिक्षक-शिक्षकेतरांची मेडिकल बिले मंजूर करावी अशी मागणी आमदार निरंजन डावखरे व भाजपा शिक्षक आघाडी मुंबई विभागाचे संयोजक अनिल बोरनारे यांनी शासनाकडे केली आहे.


यासंदर्भात निरंजन डावखरे व अनिल बोरनारे यांनी आरोग्यमंत्नी राजेश टोपे व सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांना निवेदन पाठवून ही मागणी केली आहे. शासनाने मान्यता दिलेल्या आजारांमध्ये सुमारे २७ आकस्मिक आजारांचा व सुमारे ५ गंभीर स्वरूपाच्या आजारांचा समावेश करण्यात आला आहे. गंभीर स्वरूपाच्या आजारामध्ये हृदय शस्रक्रि या, मूत्निपंड रोपण, कर्करोग इत्यादीचा समावेश करण्यात आला आहे. व त्यासाठी होणार्या खर्चाची प्रतिपूर्ती शासनाकडून केली जाते. राज्यात फार मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा संसर्ग वाढत असून अनेक ठिकाणी सरकारी हॉस्पिटलमध्ये जागा नसल्याने कोरोनाग्रस्त शिक्षक-शिक्षकेतरांना खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यावा लागत आहे. हॉस्पिटलमध्ये आलेल्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी सिव्हिल सर्जन कडे मंजुरी साठी प्रस्ताव पाठविल्यावर त्याला मंजुरी मिळत नाही त्यामुळे आरोग्य विभागाने शासकीय कर्मचारी तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांना कोरोना संसर्गाच्या प्रतिपूर्ती साठी तातडीने जी आर काढावा अशी मागणी केली आहे.
@@AUTHORINFO_V1@@