'हरामखोर' म्हणजे 'नॉटी' मग 'नॉटी' म्हणजे काय?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Sep-2020
Total Views |
Sanjay Raut_1  
 
 

आमच्याकडेही डिक्शनरी आहे : न्यायालयाचा राऊतांना प्रश्न 

मुंबई : कंगना रणौतच्या कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मात्र, याला उत्तर देत असताना शिवसेना नेते संजय राऊत यांना चांगलाच घाम फुटल्याचे दिसत आहे. सोमवारी या प्रकरणी पुन्हा सुनावणी झाली. संजय राऊत यांच्या 'हरामखोर' या वक्तव्यावर वादप्रतिवाद झाले.
 
 
कंगनाचे वकील बिरेंद्र सराफ यांनी राऊत यांनी कंगनाला एका मुलाखतीत हरामखोर म्हटल्याचा उल्लेख केला. राऊतांनी या वक्तव्याचा अर्थ 'नॉटी' हा घ्यावा, असेही राऊत म्हणाल्याचे सांगण्यात आले होते. त्यावर न्यायालयाने आज मत व्यक्तव्य केले. "आमच्याकडेही डिक्शनरी आहे, जर याचा अर्थ नॉटी असा आहे तर नॉटीचा अर्थ काय आहे.", असा प्रश्न न्यायमूर्ती एस कथावाला यांनी विचारला आहे.
 
 
प्रतिपक्षाचे वकील सराफ यांनी या प्रकरणी कंगनाने आपल्याविरोधात आपत्तीजनक भाषेचा वापर केला, असा आरोप केला. तिला उत्तर देण्यासाठी म्हणून हरामखोर या शब्दाचा वापर करण्यात आला. याद्वारे कंगनाला धडा शिकवण्यासाठी, तसे केल्याचेही स्पष्टीकरण देण्यात आले. यानंतर राऊत यांनी केलेल्या त्या वक्तव्याची चित्रफित सादर करण्यात आली.
 
 
 
राऊतांचे वकील म्हणतात,
 
राऊत यांचे वकील प्रदीप थोरात यांनी या वक्तव्यात कंगनाचे नाव घेतले नाही, असे स्पष्टीकरण देण्यात आले. यावरही न्यायालयाने आपले म्हणणे मांडले. 'तुम्ही असे म्हणत आहात का की तुम्ही त्यात हरामखोर लडकी, असे वक्तव्य केले नाही का, याचिकाकर्त्यांना तुम्ही तसे म्हटले नाही हे वक्तव्य आम्ही नोंदवू का?' दरम्यान, या प्रकरणी थोरात यांनी उद्या एक प्रतिज्ञापत्र सादर करणार असल्याचे म्हटले आहे.
 
 
'उखाड लिया'वरही चर्चा
 
कंगनाच्या वकीलांनी कार्यालय तोडल्यानंतर सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून आनंद व्यक्त करण्यात आल्याचीही गोष्ट नमूद करण्यात आली. संपूर्ण देशाने ही बाब पाहिल्याचे म्हटले आहे. या संदर्भातील सर्व पूरावे सादर करण्यास सांगितले आहे. कंगनाचे ट्विट आणि राऊतांची पूर्ण मुलाखत पुरावे म्हणून सादर करण्यास सांगितले आहे.
 
 
 
मुंबई उच्च न्यायालयात सुरू आहे सुनावणी
 
२२ सप्टेंबर रोजी सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने कार्यालयावर बुलडोझर चालवणारे अधिकारी आणि शिवसेना खासदार राऊत यांना आपले मत नोंदवण्याची मागणी केली होती. राऊत यांच्या 'उखाड दिया' या वक्तव्याची सीडीही न्यायालयात देण्यात आली आहे. यानंतर राऊतांना पक्षकार बनवण्याचा आदेश दिला होता.
 
 
 
२४ सप्टेंबर रोजी मुंबई उच्च न्यायलयाने म्हटले होते की, 'पावसाळा सुरू असताना ज्या प्रकारे कार्यालयावर हातोडा फिरवण्यात आला ही बाब दुर्लक्षित करून चालणार नाही.या प्रकरणी पालिकेलाही खडेबोल सुनावले होते. 'तुम्ही कारवाई तर जलदगतीने केलात मात्र, उत्तर द्यायला इतका वेळ का लागत आहे ', असा प्रश्न न्यायालयाला विचारण्यात आला होता.
 
 
२५ सप्टेंबर रोजी न्यायालयाने पालिका अधिकाऱ्यांचीही चौकशी केली होती. कंगनाच्या घरी जाणारे ते वकील कोण आहेत. प्रथमदर्शनी कारवाई ही चुकीच्या प्रकारे केल्याचे दिसत आहे, असेही ते म्हणाले. न्यायालयाने कंगनाचे कार्यालय तुटण्यापूर्वीचे फोटो मागवले होते. दरम्यान, राऊत यांनी पालिकेच्या कारवाईशी काहीच संबंध नसल्याचे म्हटले आहे. 

@@AUTHORINFO_V1@@