शिवसेनेच्या कंपाऊंडरला हेडलाईन बनण्याची भूक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Sep-2020
Total Views |

sanjay raut_1  



मुंबई
: शिवसेना नेते संजय राऊत आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या गुप्त भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली होती. एकमेकांवर घणाघाती टीका करणारे दोन नेते अचानक गुप्तपणे भेटल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहे. मात्र या भेटीत सामनातील मुलाखतीबाबत चर्चा झाली असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी निशाणा साधला आहे.



संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सुमारे २ तास बैठक झाली, सांताक्रुझच्या ग्रँड हयातमध्ये ही बैठक झाली, त्यामुळे भविष्यात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतल्याने अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. मात्र काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीसांच्या भेटीवर टीकास्त्र सोडले आहे. संजय निरुपम ट्विट करत म्हणाले की, शिवसेनेच्या कंपाऊंडरला हेडलाइन बनवण्यासाठी मोठी भूक लागली आहे. ही भूक नेहमी नेत्याची राजकीय कारकीर्द उद्धवस्त करते. ही दुर्भावना नाही तर वास्तविकता आहे, असेही निरुपम म्हणाले.
@@AUTHORINFO_V1@@