भारतरत्न स्वरसम्राज्ञी लतादीदींवर शुभेच्छांचा वर्षाव !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Sep-2020
Total Views |

lata mangeshkar_1 &n


मुंबई :
भारताचा आवाज अशी ओळख असलेल्या गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांचा आज वाढदिवस आहे. बॉलिवूडसह देशविदेशातील विविध भाषांतील गाण्यांना आपल्या मोहक आवाजाने स्वरबद्ध करणाऱ्या लतादिदी आज ९१ वर्षांच्या झाल्या आहेत.


लता मंगेशकर यांचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ मध्ये झाला.लता मंगेशकरांचे कुटुंब संगीतासाठी प्रसिद्ध असून, सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची सख्खी भावंडे आहेत.लतादीदी यांना गाण्याचा वारसा त्यांचे वडील मास्टर दीनानाथ मास्टर दिनानाथ मंगेशकर यांच्याकडून लाभला. लतादीदी यांचं नाव हेमा असे ठेवण्यात आले होते. पण, दीनानाथ मंगेशकर यांच्या ' भावबंध' या नाटकातील 'लतिका' या पात्राच्या नावावरुन त्यांनी हेमा नाव बदलून 'लता' असं ठेवलं.लता मंगेशकर अर्थात लतादिदींनी आपल्या जादुई आवाजाच्या जोरावर 'गानकोकिळा' अशी बिरुदावली आपल्या नावासमोर मिळवली. लता मंगेशकरांच्या कारकिर्दीची सुरुवात १९४२ मध्ये झाली आणि ती कारकीर्द सहा दशकांपेक्षा अधिक काळ टिकून आहे. त्यांनी हजारहून अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली आहेत.'महल' चित्रपटातील 'आएगा आने वाला' या गाण्यानं लतादीदींना प्रसिद्धी मिळवून दिली.



लता दीदी यांनी हजारो गाणी गायली आहेत तर ३६हून अधिक भाषांमध्ये पार्श्वगायन केले आहे.२००१ साली त्यांना 'भारतरत्‍न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.त्यांच्या नावे गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्‌समध्ये देखील विक्रम नोंदलेले आहेत. १९७४ ते १९९१ च्या कालावधीत सर्वात जास्त रेकॉर्डिंग्सचा विक्रम त्यांनी केला.लता मंगेशकर यांनी आपली वेगळी ओळख निर्माण करत हिंदी, मराठीसह अनेक भाषांमध्ये रसिकांच्या मनावर आपले नाव कोरले.वाढदिवसानिमित्त आज त्यांच्यावर बॉलिवूड, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
@@AUTHORINFO_V1@@