कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात आग ; दोघांचा मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Sep-2020
Total Views |

CPR_1  H x W: 0
कोल्हापूर: येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या ट्रामा केअर सेंटरमध्ये आज सकाळी लागलेल्या आगीत दोन सुरक्षा रक्षक जखमी झाले आहेत. गेल्या सहा महिन्यापासून कोरोनाशी झगडणाऱ्या सीपीआर प्रशासनाला सोमवारी भल्या पहाटे अचानक लागलेल्या आगीशीही झगडा करावा लागला. कोरोनाचे रुग्ण असलेल्या ट्रॉमा केअर सेंटरला पहाटे चार वाजता लागलेल्या आगीमुळे रुग्णालयात प्रचंड गोंधळ उडाला. अतिशय गंभीर अवस्थेत उपचार घेत असलेल्या १५ रुग्ण अन्य ठिकाणी स्थलांतर करुन त्यांना व्हेंटिलेटर जोडेपर्यंत दोन रुग्णांचा दुदैवांने मृत्यू झाला. शॉर्टसर्किटमुळं ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.


सीपीआरमधील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये करोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू होते. आग लागताच सर्व रुग्णांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे मोठ्या ताणतणावात काम करत असलेल्या सीपीआर रुग्णालयात सोमवारची पहाट मोठे संकट घेऊनच आली. डॉक्टर्स, नर्स तसेच अन्य कर्मचाऱ्यांचा थरकाप उडविणारी घटना सीपीआर मध्ये घडली. पहाटे पावणेचार चारच्या सुमारास वेदगंगा बिल्डींगच्या तळमजल्यावर असलेल्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये ही आग लागली.दुर्दैवाने या आगीच्या घटनेमुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला. परंते त्यांचे मृत्यू हे आगीमुळे अथवा तेथे निर्माण झालेल्या धूरामुळे नाही तर दुसरीकडे स्थलांतर करुन तात्काळ व्हेंटिलेटर जोडेपर्यंत झालेल्या विलंबामुळे झाला असल्याचा खुलासा सीपीआर प्रशासनाने केला आहे. सीपीआरमध्ये पर्यायी व्हेटिलेटरची सोय करेपर्यंत काही रुग्णांना ऑक्सीजन बेडवर ठेवण्यात आले. अन्य रुग्णांची प्रकृती ठिक असल्याचे सांगण्यात आले. सीपीआर रुग्णालयातील कर्मचारी, पोलिस, अग्नशमन दलाच्या जवानांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे अन्य रुग्णांचे प्राण वाचले. जर वेळीच मदत झाली नसती तर मोठी घटना घडली असती. परंतू प्रसंगावधान दाखवून सर्वांनीच चांगले प्रयत्न केल्याने मोठी दुर्घटना टळली.
@@AUTHORINFO_V1@@